Munde vs Damania: अंजली दामानियांविरोधात धनंजय मुंडे कोर्टात जाणार; अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार

Dhananjay Munde Filed Defamation Case: अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे वाद आता कोर्टात जाणार आहे. धनंजय मुंडे हे दमानिया यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार आहेत.
Munde vs Damania
Dhananjay Munde Filed Defamation Casesaam tv
Published On

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अंजली दामानिया या अडणीत येण्याची शक्यता आहे. दामानिया यांनी केलेले आरोप धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत फेटाळून लावले. मात्र अंजली दमानिया यांनी परत त्यांच्यावर आरोपांची झडी लावली. त्यानंतर संतप्त झालेल्या धनंजय मुंडेंनी अंजली दमानिया यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय. अंजली दमानिया यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.

दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत आपल्याला खोटे आरोप केलेत. मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर आपण लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातून अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंविरोधात अंजली दमानिया यांनी मोर्चा खोलला आहे. कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अनेक घोटाळे केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.

Munde vs Damania
Dhananjay Munde: मुंडेंचा राजीनामा फिक्स? दमानियांच्या दाव्यामुळे मुंडेंचं टेंन्शन वाढलं? नेमकं प्रकरण काय?

नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा ८८ कोटींचा घोटाळा मुंडे यांनी केल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले. अंजली दामानिया नाही तर बदनामिया आहेत, असा सणसणीत टोलाही मुंडेंनी पत्रकार परिषदेत लगावला होता. त्यानंतर लगेच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या परत आरोप केले. त्यानंतर संतप्त झालेल्या धनंजय मुंडेंनी अंजली दमानिया यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय.

Munde vs Damania
Maharashtra Politics: तुमचा जिल्हा, आमची जबाबदारी! शिंदेंच्या ठाण्यात नाईक, अजित पवारांच्या बीडमध्ये पंकजा मुंडे

धनंजय मुंडेची सोशल मीडिया पोस्ट

अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.

Munde vs Damania
Suresh Dhas : मी राजीनामा मागितला नाही, आम्ही छोटे चिल्लर कार्यकर्ते; धनंजय मुंडेंवर सुरेश धस असे का म्हणाले?

नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाळा झाल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. आता तरी भ्रष्टाचार समोर आला आहे. भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडेंनी कृषिमंत्री असताना डीबीटी योजनेला फाटा देत निविदा प्रक्रियेतून कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप दमानियांनी केला. कृषी साहित्याचे दर आणि खरेदी दरांची तफावत दाखवत दमानियांनी यांनी हिशोबच मांडलाय.

कृषी खात्याने नॅनो युरिया खरेदी केला. त्याची सध्याची किंमत 92 रुपये असताना 220 रुपयांना युरिया खरेदी केला. त्याची घोटाळ्याची किंमत 25 कोटी 19 लाख इतकी आहे. नॅनो डीएपीची किंमत 269 रुपये असताना त्याची खरेदी 590 रुपयांना झाली. यात 62 कोटी 83 लाख रुपयांचा घोटाळा झालाय. बॅटरी स्प्रेअरची किंमत 2450 रुपये असताना त्याची खरेदी 3425 रुपयांना करण्यात आली. यातून 23 कोटी 5 लाखांचा घोटाळा झाल्याचं अंजली दमानिया म्हटल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com