Powai News : मराठी गया तेल लगाने, मुंबईत सुरक्षारक्षकाने मराठीचा केला अपमान; VIDEO व्हायरल

Mumbai Powai : मुंबईत पुन्हा मराठीवरच्या अपमानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मराठीचा अपमान कुणी केलाय? आणि हे कुठं घडलंय? मनसेने मराठीबाबत कोणती भूमिका घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Powai Security guard insults Marathi language video viral
Powai Security guard insults Marathi language video viralSaam Tv News
Published On

स्नेहील झणके, साम टीव्ही

मुंबई : आता जर हे ऐकून तुम्हाला वाटत असेल की ही घटना महाराष्ट्राच्या बाहेरची आहे तर तो तुमचा गैरसमज आहे. मस्तवालपणे मराठी गया तेल लगाने असं मग्रुरीत म्हणणारा हा महाराष्ट्रातल्या मुंबईत बसून आपल्या मराठीचा अपमान करतोय. मुंबईतील पवईमधील एल अँण्ड टीमध्ये हा सुरक्षा रक्षक मराठीला नाकारत नाहीये तर धुडकावतोय.

राज ठाकरेंनी ही घोषणा केल्याच्या अवघ्या २४ तासात मराठी गया तेल लगाने म्हणणारा या हा व्हिडीओ समोर आला आणि मनसैनिकांनी राज आदेशाचं तंतोतंत पालन केलं.

Powai Security guard insults Marathi language video viral
Maharashtra Politics : धनुभाऊंमुळे पंकजाताईंच्या मंत्रिपदाला सुरुंग? अंजली दमानियांच्या दाव्याने राज्यात खळबळ, VIDEO

दुसरीकडे मनसेने मराठीसाठी पुन्हा आक्रमक होत बँकामधील व्यवहार मराठीत होतो का हे पाहण्यासाठी ठाण्यातील अनेक बँकांमध्ये धडक दिली. यावेळी बँकांचे कामकाज आणि कर्मचारी मराठी असावेत असं निवदेन मनसेच्या वतीनं देण्यात आलं. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा राग आळवलाय. असं असलं तरी परप्रांतीयांच्या मुजोरीपणामुळे मराठीला महाराष्ट्रातच न्याय मागण्याची वेळ आली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही आपुल्याच घरात हाल सोसते मराठी असंच चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.

Powai Security guard insults Marathi language video viral
मुंडेंच्या आशिर्वादाने बीडमध्ये भूमाफीया? 'शेतकऱ्यांना छळलं, जमिनी लाटल्या', दमानिया नवी फाईल उघडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com