मुंडेंच्या आशिर्वादाने बीडमध्ये भूमाफीया? 'शेतकऱ्यांना छळलं, जमिनी लाटल्या', दमानिया नवी फाईल उघडणार?

Beed Crime News : बीडमध्ये कराड गँगनंतर आता राजेंद्र घनवट हे मुंडेंच्या आशीर्वादाने जमिनी लाटत असल्याचा आरोप दमानियांनी केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? राजेंद्र घनवट कोण आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Anjali Damania alleges that Beed Rajendra Ghanwat
Anjali Damania alleges that Beed Rajendra GhanwatSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

बीड : बीडमधील गुन्हेगारीचे किस्से संपता संपत नाहीयेत. वाल्मिक कराडनंतर आता राजेंद्र घनवटच्या दहशत आणि छळवणूकीचा सातबारा अंजली दमानियांनी समोर आणलाय. बीडमधील शेतकऱ्यांना धमकावून, छळ करुन आणि गुन्हे दाखल करत जमिनी लाटल्याचा आरोप दमानियांनी केलाय. तर कराडनंतर घनवटही धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानं दमानियांनी मुंडेंची कोंडी करणारी आणखी एक फाईल उघडलीय.

दमानियांनी आरोप केलेला राज घनवट नेमका कोण आहे? पाहूयात

राजेंद्र घनवट धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय

मुंडेंच्या पत्नी आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा कंपनीचे संचालक

बीडमधील शेतकऱ्यांचा छळ, कमी किमतीत जमिनी लाटल्याचा आरोप

विरोधात लढणाऱ्या 9 शेतकऱ्यांवर घनवटांकडून खोटे गुन्हे

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप

Anjali Damania alleges that Beed Rajendra Ghanwat
Santosh Deshmukh Case : हत्येनंतरही सरपंचासाठी डर्टी प्लॅन, देशमुखांसाठी बलात्काराचा कट? हत्येनंतरचा घटनाक्रम समोर

वाल्मिक कराडनंतर राजेंद्र घनवटचे कारनामे समोर आल्याने मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत राजेंद्र घनवट शेतकऱ्यांचा आणि महिलांचा छळ करत असताना त्याला पोलीस पाठीशी का घालत होते? पोलिसांवर राजकीय दबाव होता का? शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी करुन या प्रकरणात दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे.

Anjali Damania alleges that Beed Rajendra Ghanwat
Suresh Dhas : बिश्नोईचा 'धस'का, धसांच्या जीवाला धोका? खोक्याआडून रचला हत्येचा कट, सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com