Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट, राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

रेड अलर्टमुळे उल्हासनगरातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी ६ जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, पाणी साचणे व पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शनिवार, ६ जुलै रोजी महानगरपालिका हद्दीतील सर्व राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई तसेच इतर सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

रायगडातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात शिरले पुराचे पाणी

अष्ठविनायक गणपती पैकी एक असलेल्या रायगडातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात शिरले पुराचे पाणी

मंदिराच्या सभागृहात पुराचे पाणी शिरल्याची पहिलीच घटना

सुधागड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात पुरा पाणी

नाशिक- मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात अपघात

भरधाव ट्रकने कारला मागून दिली धडक या अपघातात तीन जण गंभीर जखमी

शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटत नाशिक हून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने

धबधबा पॉईंट जवळ कारला मागून जोरदार धडक दिली या धडकेत कारचा चक्काचूर झाला. धडक देऊन ट्रक चालक पसार झाला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

ठाण्यात किरकोळ कारणावरून मराठी तरुणावर परप्रांतीय व्यक्तीकडून हल्ला

शहरातील ढोकाळी परिसरात किरकोळ कारणावरून एका मराठी तरुणावर परप्रांतीय व्यक्तीने कथितरित्या हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Palghar: मुंबई -आमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बनला प्रवासासाठी धोक्याचा

पालघर -

मुंबई -आमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बनला प्रवासासाठी धोक्याचा

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलाला पडले भगदाड

दोन दिवसांपूर्वी याच उड्डाणपुलावर जवळपास 15 पेक्षा जास्त कारचे टायर फुटून घडले होते अपघात

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून कालच केली होती तात्पुरती डागडुजी

आज पुन्हा याच पुलावर भगदाड पडल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूर - पन्हाळ्यावर कारवर झाड कोसळले

पन्हाळ्यावर मुसळधार पावसामुळे आज तीन ठिकाणी झाडे कोसळली.

आंधरबाव - लता मंगेशकर बंगला रस्त्यावर प्रकाश गवंडी यांच्या मोटारीवर आंब्याचे मोठे झाड पडून वाहनाचे मोठे नुकसान झाले.

तर सादोबा दर्ग्याजवळ आणि अंबरखाना परिसरात झाडे पडल्याने रस्ते बंद झाले व दोन वीज खांब वाकले.

नगरपरिषद आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून झाडे हटवत रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. पर्यटकांची गर्दी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

Thane: ठाण्यातील कळवा परिसरात एका स्कूल बसवर कोसळले झाड

ठाण्यातील कळवा परिसरात एका स्कूल बसवर कोसळले झाड

रविवारची सुट्टी असल्याने स्कूल बस ही शाळेलगत पार्क केली होती सुदैवाने मोठी दुर्घटना टळली..

झाड पडताच वाहतूक कोंडी होऊ नये या उद्देशाने स्थानिक नागरिकांनी व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ते झाड बाजूला केले आहे..

Nalasopara: नालासोपारा पूर्वेकडील वाकनपाडा परिसरात घरावर कोसळलं भलं मोठे झाड

नालासोपारा -

नालासोपारा पूर्वेकडील वाकनपाडा परिसरात घरावर कोसळलं भलं मोठे झाड

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम सुरू आहे.

हे धोकादायक झाड तोडण्यासाठी पालिकेला वारंवार तक्रार केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हे झाड घरावर कोसळले, असा आरोप घरमालकीण महिलेने केला आहे

Raigad: सुमारे 10 ते 12 तासांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी येथील वाहतूक सुरू

रायगड -

- सुमारे 10 ते 12 तासांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी येथील वाहतूक सुरू

- पुराचे पाणी रस्त्यावर असले तरी मोठे वाहन चालक स्वतः च्या जुम्मेदारीवर वाहन काढत आहेत

- ढोपर भरा पेक्षा अधिक पाण्यातुन मोठ्या वाहनांची वाहतुक सुरु

- छोटी वाहन काही वेळात सुरु होणार

Yavatmal: यवतमाळ शहर डीबी पथकाची अवैध गुटखा तस्करांवर कारवाई

गुटखा तस्कर कुमार याच्या घरातून यवतमाळ शहर डीबी पथकाने लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई केली त्यामुळे अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कारभार संशयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे.पळसवाडी सिंधी कॅम्प मधील कुमार नावाचा इसम मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करत होता. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला.

आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

गेल्या दोन दिवसांपासून आंबेनळी घाटात कोसळल्या छोट्या मोठ्या दरडी

दरड कोसळण्याचे घटना आणि प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने आंबेनळी घाट प्रवासासाठी बंद केला आहे

आंबेनळी घाटात आताच्या घडीला कोसळणाऱ्या दरडीचे लाईव्ह व्हिडिओ समोर

खेडमधील जगबुडी नदी पाठोपाठ नारंगी नदीला आला पूर

खेडमधील जगबुडी नदी पाठोपाठ नारंगी नदीला देखील आला पूर

नारंगी नदीनं पात्र सोडल आजूबाजूच्या परीसरात नदीच शिरलं पाणी

नरंगी नदिला आलेल्या पुराचा फटका खेड - दापोली रोडला

नारंगी नदिच पाणी खेड - दापोली रस्त्यावर

रस्त्यावर पाणी आल्याने खेड दापोली मार्गावरी वाहतूक बंद

पावसांची संतधार अद्यापही सुरुच प्रशासनाकडून नागरीकांना सतर्कतेच्या सुचना

रायगडच्या नागोठण्यात पुर परिस्थिती बिकट

रायगडच्या नागोठण्यात पुर परिस्थिती बिकट

० सकाळ पासून नागोठणे शहरात साचल आहे पुराच पाणी

० पावसाच जोर कायम असून अंबा नदीला आलेला पुर ओसरत नसल्याने नागोठणेकरांची चिंता वाढली

राममंदिर दान चोरी प्रकरणात ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन

राममंदिर दान चोरी प्रकरणात ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन मुंबईतील दादर येथे सुरु आहे. भरपावसात यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात येथे उपस्थित आहेत.

वसईत मुसळधार पावसाचा फटका; संरक्षण भिंत कोसळून 12 दुचाकींचे मोठे नुकसान

वसई-विरार शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसईतील श्रीपाल वन हाऊसिंग सोसायटीची संरक्षण भिंत सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजता अचानक कोसळली. भिंतीचा ढिगारा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे 12 दुचाकींवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे भिंत कमकुवत झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगलीत मुसळधार पावसाचा कहर; हरिपूर येथे वारणा नदी पात्राबाहेर, शेती पाण्याखाली

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मिरज तालुक्यातील हरिपूर येथे वारणा नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे. नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने भातासह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

रायगडच्या नागोठणे शहरात शिरले पुराचे पाणी

रायगडच्या नागोठणे शहरात शिरले पुराचे पाणी

० अंबा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचे नागोठणे शहरात रौद्र रूप

० नागोठणे बाजरपेठ, ST स्टँड परिसर, कोळीवाड्यात पुराचे पाणी

० नागोठणे शहरातील रस्तावर तीन ते चार फुट पाण्याची पातळ

मी रिलस्टार की रिअल स्टार मुंबईकर ठरवतील -रितू तावडे

मी रिलस्टार की रिअल स्टार मुंबईकर ठरवतील. गेल्या दोन महिन्यापासून आम्ही काम करतोय असे वक्तव्य मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलं आहे.

आंबोली घाटात वाहतूक कोंडी, दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

आंबोली घाटात वाहतूक कोंडी.

पर्यटकांच्या गाड्या पडल्या अडकून

आज रविवार सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी आंबोली धबधब्यावर गर्दी केली आहे.

मोठ्याप्रमाणात पर्यटक आंबोलीत दाखल झाल्यामुळे घाटात वाहतूक कोंडी.

वाहतूक पोलीस आंबोलीत तैनात असतानाही ट्राफिक जाम

एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा..

आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडेच वाहतूक कोंडी

आंबेगावच्या ढकेवाडीत संरक्षण भिंत कोसळली; रस्त्यावर माती-दगड, वाहतुकीला अडथळा 

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसरातील ढकेवाडी येथे रस्त्यालगत नव्याने उभारलेली संरक्षण भिंत कोसळल्याने माती आणि दगड मुख्य रस्त्यावर आले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

रत्नागिरी- रत्नागिरीकरांच विमानाचं स्वप्न आता लवकरच पुर्ण होणार

रत्नागिरी- रत्नागिरीकरांच विमानाचं स्वप्न आता लवकरच पुर्ण होणार

रत्नागिरी विमानतळ तीन ते चार महिन्यात सुरु होणार

त्यांनी यापूर्वी नऊ खासदारांची देखील बैठक लावली होती

त्यापैकी सहा खासदार आमच्याकडे आले

तशीच काही बैठक झाली असेल तर येणारे काही थांबणार नाहीत

20 कोटी नसेल 50 कोटी असेल

तीस कोटी ने कमी आले काय ते

यापूर्वी खासदारांचा आकडा त्यांनी 50 कोटी सांगितला होता

घाटकोपर येते होर्डिंग पडून घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नवी मुंबईत होण्याची शक्यता 

घाटकोपर येते होर्डिंग पडून घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नवी मुंबईत होण्याची शक्यता

वाशी रेल्वे स्टेशन समोर पटरीच्या हद्दीत उभा करण्यात आलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग चे लोखंडी तुकडे उडाले

हवेच्या तीव्रतेने होर्डिंग पडण्याची शक्यता

होर्डिंग चे लोखंडी , पत्र्याचा भाग खाली कोसळला

सुदैवाने कोणतीही जिवीत नाही

भले मोठे होर्डिंग खालून जाणाऱ्या लोकल रेल्वे वर होर्डिंग पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

दिवंगत केतन अग्रवाल चे आजोबा देवीचंद अग्रवाल हे अनंतात विलीन 

दौलत केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांच्या वर आज निगडी येथील अमरधाम शमशानभूमीमध्ये अंत्य विधी करण्यात आले. काल वयाचा 71 व्या वर्षी देवीचंद अग्रवाल यांनी शेवटचा श्वास घेतला. केतन अग्रवाल याच खून झाल्या नंतर देवीचंद अग्रवाल यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्याचं काल दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या अंत विधीला अग्रवाल समाजातील नागरिकांनी शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

रायगडच्या रसायनी येथे ST बसमध्ये आडकलेल्या प्रवाशांची सुटका

  • रायगडच्या रसायनी येथे ST बसमध्ये आडकलेल्या प्रवाशांची सुटका

  • पुराच्या पाण्यात आडकली आहे ST बस

  • ST बसमध्ये आठ प्रवासी आडकले होते

  • कर्जत–पेण मार्गावरील सारसई येथील घटना

  • पाताळगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात आडकली ST बस

वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली

भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. उंबर्डे गावच्या फाटा ते वाघजाई देवी मंदीर दरम्यान ही दरड कोसळली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर साचले पाणी

रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चार तासांपासून वाहतूक ठप्प पडले कारण मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीतील असणाऱ्या जिंदाल कंपनीजवळ कंभरभर पाणी साचल्यामुळे हजारो वाहन दोन्ही दिशेकडे अडकून पडली आहेत. दोन्ही दिशेकडे वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये अडकून पडलेले प्रवासी पाण्यात उतरून पावसाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत.. मात्र पावसाचा जोर असाच राहिला तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत पडून प्रवाशांचा मोठा कोळंबा होण्याची शक्यता आहे...

कर्जतमध्ये मुसळधार पाऊस 

कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या पाण्यामुळे वावे येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेंडसे गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्याखाली गेलेल्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

बदलापूर पश्चिमेत रस्ता खचला, मोठी दुर्घटना टळली

बदलापूर पश्चिमेत रस्ता खचला, मोठी दुर्घटना टळली

गौरी हॉलजवळचा रस्ता अचानक खचला

सिमेंटची सुरक्षा भिंत असूनही रस्ता खचला

लाखो रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह

नाल्यालगतचा रस्ता खचल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

देऊळगाव राजातून संत मुक्ताई पालखीचे जालना जिल्ह्याकडे प्रस्थान

१९५७ पासून संत मुक्ताई पालखीची अखंड सेवा..

देऊळगाव राजात १२०० वारकऱ्यांचा मुक्काम...

देऊळगाव राजातून संत मुक्ताई पालखीचे जालना जिल्ह्याकडे प्रस्थान; भक्तिमय वातावरण

ताम्हिणी घाटात मुसळधार पाऊस,वाहतुकीवर परिणाम

ताम्हिणी घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे.

अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांच्या वाहतुकीचा वेग मंदावला असून काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम

चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम

वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर शिराळा तालुक्यात भात लागवडीला सुरवात

पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

साताऱ्या पासून अवघ्या २५ किलो मीटर वर असणाऱ्या ठोसेघरचा धबधबा पहायला जिल्हयातुन पर्यटक दरवर्षी पावसाळ्यामध्ये हजेरी लावत असतात यावर्षीही मागील पाच दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे डोंगर माथ्यावरील ओढे नाले वाहू लागले आहेत.

मुंब्रामध्ये शाळेची संरक्षण भीत कोसळली, घटना CCTv मध्ये कैद.

मुंबई, ठाणे, रायगड आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळत आहे,

अशातच ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील मेरी स्कूलचा संरक्षण भीत पहाटेच्या वेळी कोसळल्याने सोसायटीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे,

या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आहे..

रत्नागिरी - खेडच्या जगबुडी नदीनं ओलांडली धोकापातळी

रत्नागिरी - खेडच्या जगबुडी नदीनं ओलांडली धोकापातळी

नदीची सध्याची पातळी 7.30 मीटर इतकी

धोका पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या सखल भागात शिरले पाणी

उल्हास नदीत पाण्याची पातळीत वाढ

कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

ठीक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.

कल्याण मोहाने परिसरातून वाहून जाणारी उल्हास नदीत देखील पाण्याची पातळी वाढली आहे. प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.

पवना धरणात 24 तासांत 5 टक्के पाणी साठ्यात वाढ

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात तुफान पाऊस बरसतोय.

गेल्या 24 तासांत धरण साठ्यात थेट पाच टक्क्यांनी वाढ झालीये.

काल दिवसभरात 96 मिलिमीटर इतका पाऊस कोसळला.

धरण क्षेत्रात आत्ता पर्यंत अवघे 440 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये.

पुण्यात पहाटेपासूनच पावसाची संतधार

पुण्यात पहाटेपासूनच पावसाची संतधार

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात आणि उपनगरात अनेक वेळा पावसाचा जोर वाढतोय

शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात

धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर वाढला असून धरणसाठ्यांत पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ

पुणे जिल्ह्याला आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. अधून मधून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्याने वाहन चालकांना आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Pune News : पुण्यात पावसाने भिंत कोसळली

पुण्यात पावसाने भिंत कोसळली

पुण्यातील जांभूळवाडी परिसरातील घटना

पार्किंग शेड वर भिंत कोसळून वाहनांचे नुकसान

सोसायटीची सीमा भिंत कोसळून अनेक वाहनांचे नुकसान

Mumbai Rain : मुंबईसाठी पुढचे ३ ते ६ तास महत्त्वाचे

पुढचे ३ ते ६ तास या भागांनी अधिक सतर्क राहण्याची गरज

वसई–मीरा रोड

बोरिवली–अंधेरी

कुर्ला–घाटकोपर–विक्रोळी

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसर

नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील 50 ते 60 सोसायटींना साचलेल्या पाण्याचा फटका

नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील 50 ते 60 सोसायटींना साचलेल्या पाण्याचा फटका

अद्यापही या सर्व सोसायटीमध्ये कमरेच्यावर पाणी साचले आहे.

यामुळे या नागरिकांना दोन दिवसापासून अंधारात दिवस काढावे लागत आहेत

तळमजल्यातील सर्व घरांमध्ये पाणी साचल्यामुळे सर्व साहित्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाबळेश्वरजवळ इनोव्हा गाडीवर झाड कोसळले; गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे चालक सुखरूप

महाबळेश्वरमधील रांजणवाडी येथे वादळी पावसामुळे रस्त्याकडेचे मोठे जांभळाचे झाड धावत्या इनोव्हा कारवर कोसळले, ज्यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले तरी चालक सुदैवाने थोडक्यात बचावला. स्थानिक गावकऱ्यांनी आणि तरुणांनी तातडीने धाव घेत झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला. रांजणवाडीतील युवकांच्या या देवदूतासारख्या कामगिरीमुळे मोठी वाहतूक कोंडी टळली असून परिसरात त्यांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम..

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 5 ते 8 जुलैदरम्यान जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले आणि सखल भागातील पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे पूरग्रस्त मार्ग टाळावेत तसेच विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली थांबू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात आज ऑरेंज अलर्ट; कणकवली वैभववाडीत जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून कणकवली, वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. किनारपट्टी भागातही जोरदार वारे व अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मालवण परीसरात काही ठीकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरीकांनी व मच्छीमारानी सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नाणेघाटात पर्यटकांची गर्दी; स्वच्छतेसाठी वनविभागाकडून ‘उपद्रव शुल्क’

राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नाणेघाटात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धुके, धबधबे आणि गारव्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल होत असताना, वाढत्या पर्यटनामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक वनसमितीने ‘उपद्रव शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे.

रिपब्लिकन पक्ष,ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते,पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही - मंत्री रामदास आठवले.

रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते.. पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही.. फक्त मला मिळतं,असं मुश्किल विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत,मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे. सांगलीच्या मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांचे बंधू अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते..

बदलापूर आणि वांगणी परिसरात पावसाची संततधार सुरूच

बदलापूर आणि वांगणी परिसरात आजही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरले आहेत. उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ झालीय. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बदलापूरच्या सखल भागात पाणी साचलय. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उल्हास नदी तसंच धबधब्यांवर नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय.

पनवेल नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज

नवी मुंबई शहरामध्ये काल मुसळधार पाऊस पडला अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं अशा स्थितीमध्ये आज मात्र पावसाने शंभर विश्रांती घेतलेली आहे या दृष्टीने पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्यात आलेला आहे तसे आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आलेली नाहीये त्यामुळे महापौर आणि आयुक्तांकडून यादृष्टीने खबरदारी घेतली जात आहे

रायगड जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस

रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून सलग पाचव्या दिवशीही जिल्ह्याच्या सर्वच भागात जोर कायम आहे. काल रात्रीपासून अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अंबा आणि कुंडलिका या दोन्ही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे तर अन्य नद्यांचे पात्र अद्यापही इशारा पातळीच्या खाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील आपत्कालीन मदत यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे. सध्या पंचगंगा 27 फुटांवरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाले आहे.

पालघर जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट

पालघर जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट. रात्रभर पावसाची रिपरिंप असली तरी आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. काल झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजावन विस्कळीत झाले होते. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ .धामणी धरण 27 टक्क्यांनी भरल. जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या पाण्याच्या प्रश्न मिटला. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांना पूर. नागरिकांना सतर्क राहण्याच जिल्हा प्रशासनाचा आवाहन.

उत्तर पुण्यात मान्सून सक्रिय; संततधार पावसाने खरीप हंगामाला दिलासा

उत्तर पुणे जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून, खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मागील २ दिवसापांसून मुंबई आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com