Ganesh Festival: मुस्लिम गणेश भक्तांनी साकारली प्रति वैष्णव देवी आरास

मुस्लिम गणेश भक्तांनी साकारला प्रति वैष्णव देवी
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv
Published On

संजय गडदे

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडीला आंबोली परिसरात मुस्लिम गणेश भक्त हारून खान यांच्याकडून यंदा जम्मू– काश्मीरमध्ये असलेल्या माता वैष्णव देवी मंदिराचा देखावा साकारला आहे. (Mumbai News Ganesh Festival)

Ganesh Festival
Rain: वादळी पावसामुळे पिकांना फटका; बळीराजाचे नुकसान

आंबोली येथील अखिल आंबोली सार्वजनिक गणेश उत्सव (Ganesh Festival) मंडळांचे काही मुस्लिम कार्यकर्ते माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणार होते. मात्र कोरोना (Corona) महामारीच्या संकटामुळे या भक्तांना जाता आले नाही. मात्र यानंतर मुस्लिम गणेश भक्तांसाठी आंबोली येथे माता वैष्णव देवी मंदिराचा देखावा उभारून इथेच सर्वांना दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. हा देखावा पाहण्यासाठी अंधेरीकर मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहेत. इथेच माता वैष्णव देवीचे दर्शन करता येत असल्याने भक्तामध्ये उत्साह पहायाला मिळत आहे.

१५ वर्षांपासून अध्‍यक्ष

देशात एकीकडे धार्मिक सलोखा बिघडत चालला आहे. मात्र अशा वेळी अंधेरी पश्चिमेकडील अखिल आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मात्र मुस्लिम गणेश भक्त हारून खान यांना मागील 15 वर्षापासून अध्यक्ष म्हणून नेमले आहे. अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हारून खान यांनी गणपती मंडळाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम भाईचारा जपण्याचे काम देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com