Mumbai Nashik Highway Accident: भरधाव कंटेनरने कारला फरफटत नेलं, एकाचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Mumbai Nashik Highway Accident
Mumbai Nashik Highway AccidentSaam TV
Published On: 

Mumbai Nashik Highway Accident News: मुंबई- नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik Highway) अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. काल रात्री देखील मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनर आणि कार यांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा जवळील खडवली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. कंटेनर आणि कार या दोघांची जोरदार धडक झाली. कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट समोर असलेल्या कारवर धडकला. यावेळी कंटेनरचा वेग इतका होता की, त्याने कारला काही अंतरावर फरफटत नेलं. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या आईस्क्रीम टेम्पोलाही कंटेनरची जोरदार धडक बसली.

Mumbai Nashik Highway Accident
Maharashtra Politics: शरद पवारांना विठ्ठल म्हणणं तात्काळ थांबवा; अन्यथा... तुषार भोसलेंचा इशारा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात मौजम अन्सारीव (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव असून चैतन्य कासने (वय २४) आणि नशिर अन्सारी (वय ३३) जयेश सपाट (वय २५) अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अपघातात दोन ते तीन दुचाकीसह एक कार आणि आईस्क्रीम टेम्पो या वाहनांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.