Samruddhi Mahamarg Accident : महामार्ग की अपघातांचा रनवे! भरधाव वाहनासमोर अचानक तरस आलं अन्...

विकासाचा महामार्ग असणारा समृद्धी महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच आहे.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam TV
Published On

Samruddhi Mahamarg Accident News : विकासाचा महामार्ग असणारा समृद्धी महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच आहे. बुधवारी रात्री समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील डूबेरे शिवारात ही घटना घडली. या घटनेमुळे मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg News: सावधान! समृद्धी महामार्गावरून अतिवेगाने गाडी चालवताय? मग हा VIDEO पाहाच...

विशेष म्हणजे या महामार्गाचा टप्पा क्रमांक १२ वाहतूकीसाठी खुला झालेला नसतांनाही वाहनचालकांकडून महामार्गाचा वापर केला जात आहे. त्यामुळे अपघातांच्या अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील डूबेरे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा जागीच मृत्यू झाला.

अगदी काल-परवाच समृद्धी मार्गावरून (Samruddhi Mahamarg)  नीलगायींचा कळप जात असतानाचा व्हिडिओ विदर्भातील प्राणी मित्र किशोर रिठे यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. अचानक महामार्गावर आलेल्या कळपामुळे अपघात (Accident) होण्याची शक्यता असल्याचं या व्हिडीओमधून दिसत होतं. त्यातच आता ही घटना घडल्याने मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Crime News : कॉलेजवरून घरी परतत होत्या तरुणी; वाटेतच घडली भयंकर घटना, एकीचा मृत्यू

समृद्धी महामार्गाचे नुकतेच लोकार्पण झाले. नागपूर येथील एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मार्ग सुरू करण्यात आला. हा मार्ग विदर्भातील तब्बल ३ अभयारंण्यातून जातो. येथील वन्य प्राण्यांना या मार्गाचा धोका होऊ नये, तसेच ते महामार्गावर येऊ नये यासाठी तब्बल ९ ठिकाणी ओव्हर पास आणि अंडर पास बनवण्यात आले आहेत. मात्र, असे असताना देखील वन्य प्राणी हे महामार्गावर येत असून अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

यापूर्वीही समृद्धी महामार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक लागून मृत्यू झाला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवा आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com