Mhada News : मुंबई, पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यात सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडा वर्षभरात बांधणार १९ हजार ४९७ घरे

Mumbai Mhada Breaking News : म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात ५१९९ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Maharashtra MHADA Marathi News
Maharashtra MHADA Marathi NewsSaam Tv News
Published On

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

म्हाडाचा सन २०२४-२५ चा सुधारित व सन २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२५-२०२६ च्या १५९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

Maharashtra MHADA Marathi News
Beed News : जेलमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली? तुरुंग प्रशासनानं सांगितली A टू Z कहाणी

म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात ५१९९ सदनिकांची उभारणी करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळाअंतर्गत ९९०२ सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट असून सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी १४०८.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे मंडळाअंतर्गत १८३६ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५८५.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १००९.३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १६०८ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २३१.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra MHADA Marathi News
Beed Crime : संपवल्याशिवाय चप्पल न घालण्याचा एकाचा निश्चय, दुसऱ्यानं बांधली दाढी न करण्याची खूणगाठ; कराड-गिते उठलेले एकमेकांच्या जीवावर

नाशिक मंडळाअंतर्गत ९१ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती मंडळाअंतर्गत १६९ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी अर्थसंकल्पात ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी रुपये, परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी २० कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरासाठी ५७.५० कोटी रुपये, बोरीवली सर्वे क्र. १६० वरील योजनेसाठी २०० कोटी रुपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी १७७.७९ कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये, मागाठाणे बोरीवली योजनेसाठी ८५ कोटी रुपये, एक्सर बोरीवली तटरक्षक दल योजनेसाठी ३० कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra MHADA Marathi News
Chhatrapati Sambhajinagar : बायकोनंच रचला उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा कट, महाराष्ट्र हादरवणारी घटना

कोकण मंडळांतर्गतच्या पाचपाखाडी-ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केयर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी १५ कोटी रुपये, माजिवाडे-ठाणे विवेकानंद नगर येथे १०० बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी ३० कोटी रुपये, विरार बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करणे कामासाठी ३३.८५ कोटी रुपये, वर्तकनगर-ठाणे पोलीस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी ९० कोटी रुपये, गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी ११५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

नागपूर मंडळांतर्गत चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी ३७१.२० कोटी रुपये, टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी ३५० कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra MHADA Marathi News
Maharashtra Weather : परभणीत उन्हाचा कहर; बीड, मालेगावात अवकाळी पाऊस; राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com