VIDEO : आई-वडील आत, चिमुकला मेट्रोबाहेर, पालकांचा हलगर्जीपणा; कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Goregaon Bangur Nagar Metro Station : मुंबई मेट्रोच्या बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर हा धक्कादायक प्रकरा उघडकीस आला आहे. दोन वर्षाचा मुलगा मेट्रोत चढताना दरवाजे बंद झाले आणि तो दरवाजाबाहेरच थांबला.
Goregaon Bangur Nagar Metro Station
Goregaon Bangur Nagar Metro StationSaam Tv News
Published On

मुंबई : गोरेगावमधील एका मेट्रो स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला असून पालकांचं लक्ष नसल्यामुळे दोन वर्षांचा मुलगा मेट्रोमधून अचानक बाहेर आला आणि तिथेच थांबला. मात्र मेट्रो स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यामुळे मोठा अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याने तात्काळ मेट्रो चालकाला ट्रेन सुरू करण्यास थांबवलं. त्यानंतर मेट्रोचं दार उघडलं आणि मुलगा पुन्हा सुखरुप आत गेला.

मुंबई मेट्रोच्या बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षाचा मुलगा मेट्रोत चढताना दरवाजे बंद झाले आणि तो दरवाजाबाहेरच थांबला. त्याचे पालक मात्र मेट्रोच्या आत शिरले. त्यांचं लक्ष नसल्यानं तो मुलगा तसाच मेट्रोबाहेर थांबला. नंतर मेट्रोचे दरवाजे बंद झाल्याने तो मुलगा कावराबावरा झाला. दरवाजे बंद झाले तरीही तो मुलगा दरवाजाजवळ येऊन आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. मेट्रो सुरू होणार इतक्यात एका कर्मचाऱ्याने ते पाहिलं आणि त्याने ड्रायव्हरला मेट्रो सुरू न करण्याच्या सूचना दिल्या. नंतर तत्परतेने तो कर्मचारी त्या मुलाकडे धावत गेला.

Goregaon Bangur Nagar Metro Station
Sanjay Raut : 'गुलाबराव पाटलांच्या खात्यात ५० कोटी बेकायदेशीपरणे जमा, पक्ष सोडताना थरथरत होते'; संजय राऊतांचा दावा

एवढं सगळं घडल्यानंतर त्या मेट्रोचे दरवाजे पुन्हा उघडले आणि तो मुलगा आतमध्ये गेला. त्यामुळे त्या मुलाच्या पालकांच्या आणि ते दृश्य पाहणाऱ्या सगळ्यांच्याच जिवात जीव आला. संपूर्ण घटना बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. या दोन वर्षांच्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव संकेत चोडणकर असं आहे.

Goregaon Bangur Nagar Metro Station
BJP MLA: पादरीचा सैराट करेल त्याला लाख रूपये.. भाजप आमदाराच्या वादग्रस्त विधानानंतर ख्रिश्चन समाज आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com