Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Mumbai Goa Highway Accident update : मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway Accident Saam tv

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

रायगड : मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पाऊण तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात झाला. कारने समोरील ट्रेलरला मागून धडक दिली. यात कारमधील तिघे जण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा भयंकर अपघात झाला.

Mumbai Goa Highway Accident
Buldhana Accident : भरधाव दुचाकी बसला धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

कारने ट्रेलरला मागून इतक्या मोठ्यानं धडक दिली होती की कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातामुळं महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. स्थानिकांनीही पोलिसांना मदत केली. पाऊण तासात महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com