Dawood Ibrahim Property: दाऊदची २ कोटींची मालमत्ता डोइजड झाली? खरेदी करणाऱ्या व्यक्तीने थकवला पहिलाच हप्ता

Mumbai Crime: अजय श्रीवास्तव यांना एकूण बोलीच्या २५ टक्के रक्कम पहिला हप्ता म्हणून जमा करायची आहे. मात्र अद्याप बोलीचा पहिला हप्ताही त्यांनी जमा केलेला नाही.
Dawood Ibrahim Property
Dawood Ibrahim PropertySaam TV
Published On

Dawood Ibrahim :

फरार गुंड दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील मालमत्तेबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे. दाऊद इब्राहिमची मालमत्ता विकत घेणाऱ्या व्यक्तीने पहिलाच हप्ता थकवला आहे. सध्या पैशांची अडचण असल्याने या व्यक्तीने पहिला हप्ता भरण्यासाठी वेळ वाढवून मागितला आहे.

Dawood Ibrahim Property
Dawood Ibrahim: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला खाण्यातून विषबाधा की विषप्रयोग? उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

५ जानेवारीला दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव झाला. यावेळी दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी ही मालमत्ता खरेदी केली. अजय श्रीवास्तव यांना एकूण बोलीच्या २५ टक्के रक्कम पहिला हप्ता म्हणून जमा करायची आहे. मात्र अद्याप बोलीचा पहिला हप्ताही त्यांनी जमा केलेला नाही.

प्रशासनाने दाऊदच्या दोन भूखंडांसाठी बोली लावली होती. ही बोली तब्बल २.०१ कोटींची लवण्यात आली होती. त्यानंतर श्रीवास्तव यांनी एका प्लॉटचा पहिला हप्ता ३.२८ लाख रुपये पूर्ण भरले. मात्र दुसऱ्या प्लॉटचा हप्ता भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले नाही. त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी वकिलांनी आणखी मुदतवाढ मागितली आहे.

लिलाव झाल्याच्या एका महिन्याच्या आत श्रीवास्तव यांना बोलीच्या २५ टक्के रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. श्रीवास्तव यांनी जास्तीचा वेळ मागितल्याने पुढे काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सदर मालमत्ता सफेमा कायद्यांतर्गत दाऊदची आई अमिना बीकडून जप्त करण्यात आली होती. १५,४४० रुपये सुरवातीची किंमत असताना देखील श्रीवास्तव यांनी थेट २.०१ कोटी रुपयांची बोली लावली होती. ५ जानेवारीला मुंबईत दाऊदच्या या दोन्ही मालमत्तांचा लिलाव झाला होता.

Dawood Ibrahim Property
Satara Crime News : पाचगणीमध्ये रिसाॅर्टवर छापा, 48 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com