कोस्टलला तडे, पीएमओची तडी; १४ हजार कोटींचा रस्ता उखडला, २५ दिवसांतच कोस्टल रोडची डागडुजी

Mumbai Coastal Road Cracks : मोठा गाजावाजा करुन ५ टप्प्यात उद्धाटनं करुन अखेर कोस्टल रोड मुंबईत सुरु झाला. समुद्राच्या पोटातून जाणारा हा देशातील पहिला रस्ता असल्यानं अर्थातच त्याचं कौतुक देशभरात झालं.
Mumbai coastal road
Mumbai coastal roadSaamTV
Published On

मुंबई : मुंबईचं भूषण म्हणून मिरवण्यात येणारं आणि काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे पडले आहेत...आणि याची गंभीर दखल दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर थेट पंतप्रधान मोदींच्या कार्य़ालय़ानं घेतलीय...नेमकं काय झालंय कोस्टल रोडचं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

मोठा गाजावाजा करुन ५ टप्प्यात उद्धाटनं करुन अखेर कोस्टल रोड मुंबईत सुरु झाला. समुद्राच्या पोटातून जाणारा हा देशातील पहिला रस्ता असल्यानं अर्थातच त्याचं कौतुक देशभरात झालं. १४ हजार कोटी खर्च करुन हा मार्ग बनवल्यानं मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवायला मदत झाली. मात्र या कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जामुळे पंतप्रधानांच्या कार्यलयाचाही संताप झालाय. कारण कोस्टल रोडला अवघ्या २५ दिवसांत तडे पडले असून डागडूजी करण्याची नामुष्की ओढवलीय. नेमकं काय झालं कोस्टल रोडवर ते पाहूयात.

Mumbai coastal road
Nashik Chandwad Accident : घाट उतरताना ब्रेक फेल, वाहन एकमेकांना धडकले, एक मृत्यू तर २२ गंभीर; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

कोस्टल रोडला तडे

14 हजार कोटी रुपयांत तयार झालेल्या कोस्टल रोडवर क्रॅक

हाजी अली आणि वरळी दरम्यानचा भाग प्रभावित

पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ दखल, मुख्य सचिवांकडून माहिती मागवली

राज्य सरकारनंही बीएमसीकडून स्पष्टीकरण मागितलं

कोस्टल रोडवर आधी गळती आणि आता तडे गेल्याचं समोर

याबाबत महापालिका आयक्तांना विचारणा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं

कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी महत्त्वाकांशी प्रकल्प. दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी या रस्त्यामुळे फुटली. भूमिपुजन, ५-५ लोकार्पणाचे सोहळे हे तीन आजी माजी मुख्यमंत्र्यांनी करत क्रेडीट घेण्याचा प्रयत्न केला परंतू आता अगदी २०-२५ दिवसातच जर या कोस्टल रोडला डागडुली करण्याची नामुष्की ओढवत असेल कर तर मात्र गंभीर बाब आहे.

Mumbai coastal road
SSC Board Paper Leak : 10 वीचा मराठीचा पेपर फुटला, परीक्षा सुरू असतानाच फुटलेला पेपर 'साम'च्या हाती; पाहा स्पेशल रिपोर्ट

कोस्टल रोडवरील बोगद्याला या आधी गळती लागली होती. त्यानंतर खड्डे पडले आणि आता तडे गेल्यानं डागडूजीची वेळ आली. हा कामाचा दर्जा पाहून कोस्टल रोडच्या नावावर १४ हजार कोटी रुपये हे अरबी समुद्रात बुडवणारे कोण आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई होणं देखिल तितकंच गरजेचं आहे.

Mumbai coastal road
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, पुन्हा मोठा राजकीय भूकंप; केंद्रबिंदू गोंदियात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com