Ladki Bahin Yojana:
Mukhyamantri Ladki Bahin YojanaSaam TV

Ladki Bahin Yojana: अजब कारभार! ‘लाडक्या बहिणी’चे पैसे चक्क बेरोजगार भावाच्या खात्यात, अर्ज न करता मिळाले पैसे!

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरी ही त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले.
Published on

संजय राठोड, साम टिव्ही यवतमाळ

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे. पण यवतमाळच्या आर्णीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरी ही त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले...

जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदा या बॅक खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे. या प्रकाराने खुद्द जाफरही हबकून केला आहे.

Ladki Bahin Yojana:
VIDEO : लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून Uddhav Thackeray यांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करुन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरु होती. मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही. पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Ladki Bahin Yojana:
Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

१४ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८० लाखांपेक्षा जास्त भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com