MSRTC News: ‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स

MSRTC Aapli ST’ App: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्रातील १ लाख मार्गांवरील १२,००० बसेसचे रिअल-टाइम ट्रॅकिंग देणारे मोबाईल अॅप लाँन्च केले आहे. प्रवासी आता थेट बस कधी येईल, स्थानकावरून कधी सुटेल यांचीही माहिती अॅपवरून मिळेल.
MSRTC  Aapli ST’ App
MSRTC launches ‘Aapli ST’ app to provide real-time bus location updates for passengers across Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • प्रवाशांना बसचे रिअल-टाइम अपडेट्स देण्यासाठी ‘आपली एसटी’ अॅप लाँन्च.

  • १२,००० बस आणि १ लाख मार्ग अॅपशी जोडले गेले आहेत.

  • बस कुठे आहे, कधी पोहोचेल याची माहिती आता मोबाईलवर मिळणार.

राज्यातील गावांना-शहरांशी जोडणाऱ्या एसटी बसमध्ये आता मोठी सुधारणा होत आहेत. ज्याप्रकारे लोकल रेल्वे मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्याचप्रकारे एसटी बसकडे राज्याची जीवनवाहिनी म्हणून पाहिलं जातं. लाखो प्रवाशी एसटी बसनं प्रवास करतात. पण अनेकवेळा प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बस स्टॉपवर उभं रहावं लागतं. बस नेमकी कुठे आहे कधी पोहचणार याची योग्य माहिती मिळत नसल्यानं प्रवाशांमध्ये चीडचीड होत असते. प्रवाशांच्या या समस्येची दखल घेत MSRTCनं एक खास सुविधा सुरू केलीय. (MSRTC launches Aapli ST app for real-time bus tracking in Maharashtra)

आता 'आपली एसटी' या अॅपच्या मदतीनं बस कुठे आहे कोणत्या स्थानकात आहे, याची माहिती मिळणार आहे. मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे प्रवासी बसेसचे अचूक स्थान ट्रॅक करू शकणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर हे अॅप औपचारिकपणे लाँन्च करण्यात आलं. याबाबतची माहिती परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

MSRTC  Aapli ST’ App
Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

रोझमेर्टा ऑटोटेक लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केलेल्या या अ‍ॅपने महाराष्ट्रातील १२,००० हून अधिक बसेस आणि १ लाखाहून अधिक मार्गांचे मॅपिंग करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे प्रवाशांना बस सुटण्याच्या वेळा (STD) आणि अंदाजे आगमन वेळा (ETA) सारखी रिअल-टाइम माहिती मिळू शकते. यामुळे प्रवाशांना थांब्यांवर जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही आणि बस उपलब्धतेनुसार थेट पोहोचता येईल.

MSRTC  Aapli ST’ App
Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही हे दोन्ही युझर्स हे अॅप वापरू शकतील. जवळचा बस स्टॉप शोधणे, दोन स्टॉपमधील वेळापत्रक तपासणे, सेवा किंवा तिकीट क्रमांक वापरून थेट बस ट्रॅकिंग करता येईल. एका-क्लिकने आपत्कालीन संपर्क क्रमांकावर कॉलिंग करता येईल. दरम्यान या अॅपमध्ये सध्या १२,००० हून अधिक बसेसचा लाईव्ह डेटा उपलब्ध आहे. लवकरच सर्व बसेसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

आगाऊ जागा आरक्षित करणाऱ्या प्रवाशांसाठी लाईव्ह ट्रॅकिंगसह तिकीट बुकिंग इंटिग्रेशन देखील विकसित केले जाणार आहे. ‘आपली एसटी’ (मराठी नाव म्हणजे आमची एसटी) बस प्रवास अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी अनुकूल बनवेल. तसेच यात अजून काही सुधारणा असेल तर प्रवाशांनी अभिप्राय द्यावेत असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com