Electricity Price Increase : महावितरणकडून वीजदरवाढीचा झटका; १ एप्रिलपासून नवे दर लागू

MSEB Electricity Price Increase : नवे आर्थिक वर्ष सुरू होताच महावितरणने वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. राज्याचा आजपासून नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत. वीज बिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
Electricity Price Increase
Electricity Price IncreaseSaam Digital

Electricity Price Increase

नवे आर्थिक वर्ष सुरू होताच महावितरणने वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. राज्याचा आजपासून नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत. वीज बिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षीही महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला होता. वर्षाला दरवाढ होत असल्याने महावितरकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू होत असून १ एप्रिलपासूनच हे नवे वीज दर लागू होतील. याचबरोबर केंद्राकडून अनेक नियमात बदल करण्यात आले आहेत.

वीजबिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना १ एप्रिलपासून वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Electricity Price Increase
Garlic Price : लसणाच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या प्रति किलाेचा भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com