Garlic Price : लसणाच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या प्रति किलाेचा भाव

Nandurbar Latest Marathi News : रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या लसणाचा दर वाढला बाजारात दिवसेंदिवस वाढू लागल्याने गृहिणींचे आर्थिक गणित बिघडू लागले हाेते.
Garlic Price
Garlic PriceSaam tv

- सागर निकवाडे

Nandurbar :

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्यापूर्वी चारशे रुपये किलो मिळणारा लसणाचा दर आता गडगडला आहे. आता लसूण 160 रुपये प्रति किलोने विक्री होऊ लागला आहे. लसणाचा दर कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लसणाचा दर वाढला हाेता त्यावेळी शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत होते. परंतु आवक वाढल्याने आता लसणाचा दर पुन्हा घसरु लागला आहे. लसणाची काढणीला वेग आला असल्याने लसणाच्या दरात आणखीन घसरण हाेईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

Garlic Price
Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोलीची जागा भाजप जिंकून दाखवेल, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध; मुटकुळेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

नंदुरबार जिल्ह्यातील लसूण राज्यात इतरही बाजारपेठेत जात असल्याने नंदुरबारच्या लसणाची ख्याती वाढली आहे. यावर्षी लसणाला चांगला भाव मिळाला असल्याने पुढील हंगामात लसूण लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Garlic Price
Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com