MPSCची घोडचूक; एकच उत्तर ठरवलं चूक अन् बरोबर

MPSC News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तरपत्रिका तपासण्यात घोडचूक केल्याचे समोर आले आहे. एमपीएससीने एका विद्यार्थ्याचे उत्तर बरोबर ठरवले आहे तर तेच उत्तर लिहणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याचे गुण कापले आहेत.
MPSC Exams
MPSC ExamsSaam tv
Published On

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या एका परीक्षेत मोठी चूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.. वर्णनात्मक पद्धतीने घेतलेल्या परीक्षेत पारदर्शकता नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने होणार ही परीक्षा वस्तुनिष्ठ एमसीक्यू पद्धतीने व्हावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे.

MPSC Exams
MPSC : लेकींनी नाव कमावलं, गॅरेजवाल्याच्या दोन्ही मुली झाल्या सरकारी अधिकारी; मंत्रालयात पोस्टिंग; सोलापूरात होतंय कौतुक

२०२३ मध्ये आयोगाने निरीक्षक वैद्यमापन शास्त्र गट बी परीक्षा घेतली होती. यात कमी गुण मिळाल्याने उत्तरप्रत्रिकेची प्रत मागणवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. आयोगाने ही उत्तरपत्रिकेची प्रत दिली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली. यानंतर उत्तरपत्रिका देण्यात आली. मात्र, या उत्तरप्रत्रिकांमध्ये गुण देताना चूक झाल्याचे समोर आले आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यार्थ्याला बरोबर दिले आहे तर दुसऱ्या विद्यार्थ्याने तेच उत्तर दिले असताना त्याचे गुण कापण्यात आले, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.यामुळे परीक्षेत उत्तरपत्रिका चेक करताना मोठी चूक झाली आहे.

याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले की, बरोबर उत्तर दिल्यानंतर एकाला मार्क दिले तर दुसऱ्याचे उत्तर चुकीचे ठरवले, फक्त दोनच उत्तरत्रिका मिळाल्या होत्या. यातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या परीक्षेचे तीन हजार विद्यार्थ्यांच्या पेपरबाबत आयोगाने चुक केली असल्याची शक्यता नाकारता येथ नाही. त्यामुळे सर्व उत्तरपत्रिकांचे तपासणी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

MPSC Exams
Success Story: सावकाराने आईचे २२० रुपये बुडवले, मित्रांनी खिल्ली उडवली, मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS हेमंत पारीक यांचा प्रवास

याबाबत अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. वर्मनात्मक पद्धतीने पेपर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही आक्षेप असेल तर त्यांनी आयोगाकडे तक्रार करावी, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितलं आहे.

MPSC Exams
Success Story: सावकाराने आईचे २२० रुपये बुडवले, मित्रांनी खिल्ली उडवली, मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS हेमंत पारीक यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com