Maharashtra Election 2024: दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; संजय राऊत यांचा दावा

Sanjay Raut on Narayan Rane News: राणेंच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'दोन महिन्यानंतर सत्ता आल्यानंतर नारायण राणे हे तुरुंगात असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते.
Narayan Rane, Sanjay Raut
Narayan Rane, Sanjay Raut Saam Tv

Sanjay Raut In Sangli:

ऐन लोकसभा निवडणुकीत नारायण राणे आणि ठाकरे गटाने एकमेकांवर 'शब्दबाण' मारण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होणार असल्याचा दावा केला. राणेंच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'दोन महिन्यानंतर सत्ता आल्यानंतर नारायण राणे हे तुरुंगात असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते. (Maharshtra Election 2024 News)

ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर काँग्रेसचा दावा होता. मात्र, ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊ केली. आता चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सांगलीच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांवर भाष्य केलं.

Narayan Rane, Sanjay Raut
Suresh Mhatre : शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच बाळ्या मामा प्रशासनाच्या रडारवर; भिवंडीतील गोदामांवर MMRDAकडून कारवाई

कदम आणि पाटील यांची नाराजी दूर करू'

'विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार, असे संजय राऊत म्हणाले.

Narayan Rane, Sanjay Raut
Konkan Politics : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : नितेश राणेंचं वैभव नाईक, विनायक राऊतांना समाेरासमाेर येण्याचे आव्हान

काल गुरुवारी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना अटक होणार, असा दावा केला. याबाबतच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले,'दोन महिन्यानंतर सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील. नारायण राणे यांच्या ईडी/सीबीआयच्या बंद फाईल आमची सत्ता आल्यावर उघडणार आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com