School Timings: दुसरीपर्यंत शाळेच्या वेळांमध्ये बदल; विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

School Timings For Students: विद्यार्थ्यांची झोप पूर्ण झाली नाही तर डोके दुखी सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी ही गोष्ट समोर आणली होती.
School Timings
School TimingsSaam TV
Published On

Education Minister Deepak Kesarkar Announcement:

सकाळी ७ किंवा ८ वाजता शाळा असली की विद्यार्थ्यांना रोज पहाटे उठावं लागतं. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या चिमुकल्यांची यामुळे झोप पूर्ण होत नाही. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील होतो. त्यामुळे शाळेच्या वेळेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सकाळची शाळा देखील ९ नंतरच सुरू होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

School Timings
UTI Training In School : वाढत्या वयात मुलांना युटीआयचे प्रशिक्षण गरजेचे, कशी लावाल स्वच्छतेची सवय?

८ वाजेपर्यंत आरामात झोपा

विद्यार्थ्यांची झोप पूर्ण झाली नाही तर डोकेदुखी सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी ही गोष्ट समोर आणली होती. त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेळेबाबत ही घोषणा केली आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

अंतिम निर्णयासाठी समिती स्थापन

बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा विचार केला तर त्यांच्यासाठी झोप महत्वाची आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेबाबत सरकारने विचार करावा, असं राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी सुचवलं होतं. त्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने मनोवैज्ञानिक, बालरोगतज्ज्ञ यांची समिती स्थापन केली आहे. या समितीकडून शेवटचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असं माध्यमांशी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं.

पुढल्या शैक्षणिक वर्षापासून नियम लागू होणार

माध्यमांशी संवाद साधताना केसरकरांनी पुढे म्हटलं की, शाळांच्या वेळेबाबतचा नियम पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रातील शाळेची (School) वेळ ७ ऐवजी ९ किंवा त्यापेक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

School Timings
School Bus Accident: स्कुलबसचा अपघात; महिला कर्मचारी जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com