UTI Training In School : वाढत्या वयात मुलांना युटीआयचे प्रशिक्षण गरजेचे, कशी लावाल स्वच्छतेची सवय?

UTI Symptoms : शालेय मुलांमध्ये शौचालयसंबंधीत आणि स्वच्छतेविषयी जागरुकता करणे अधिक गरजेचे आहे.
UTI Training In School
UTI Training In SchoolSaam Tv
Published On

UTI Problem In Child :

लहान मुलांमध्ये युटीआयचे संक्रमण लगेच होते. वेळीच काळजी न घेतल्यास त्यांच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शालेय मुलांमध्ये शौचालयसंबंधीत आणि स्वच्छतेविषयी जागरुकता करणे अधिक गरजेचे आहे.

याविषयी मत मांडले आहे, पुण्यातील निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खराडी येथील डॉ. तुषार पारीख यांनी. युटिआर समस्येबद्दल माहिती देणे काळाची गरज आहे. तसेच वेळीच प्रतिबंघ आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेऊया

UTI Training In School
Child Care Tips : वाढत्या वयात मुलांचा सर्वांगीण विकास कसा कराल? पालकांनो, कशी घ्याल काळजी

1. युटीआयचा आजार (Disease) कसा होतो.

जेव्हा जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा युटीआयचा त्रास जाणवू लागतो त्यामुळे मूत्राशय किंवा मूत्रपिंडासारख्या विविध भागांमध्ये संक्रमण होते. वाढत्या वयात मुलांमध्ये युटीआय संसर्गची अनेक लक्षणे दिसून येत आहेत.

2. युटीआयची लक्षणे (Symptoms)

  • सतत लघवी आल्यासारखी वाटणे

  • लघवी करताना वेदना (Pain) किंवा अस्वस्थता जाणवणे

  • लघवी रोखता न येणे

  • पोटदुखी

  • ताप

  • दुर्गंधीयुक्त मूत्र

  • अंथरुण ओले करणे

मुलांमध्ये ही लक्षणे दिसत असतील आणि वेळीच उपाचर न केल्यास भविष्यात मूत्रपिंडाच्या संसर्गाचा त्रास होऊ शकतो. या संक्रमणांमुळे मूत्रपिंडाच्या समस्या उद्भवू शकतात.

3. मुलांना स्वच्छतेची सवय कशी लावाल?

1. हात धुणे:

निरोगी राहाण्यासाठी वारंवार हात धुणे गरेजेचे आहे. हाताची स्वच्छता मूत्रमार्गात जीवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मदत करतात.

2. पुसण्याचे तंत्र:

मुलींना शौचालयाचा वापर केल्यानंतर वरुन खालच्या दिशेने स्वच्छतेचे तंत्र शिकवले गेले पाहिजे. असे न केल्यास हे गुदद्वारातील बॅक्टेरियांना मूत्रमार्गात प्रवेश करण्यास आणि संक्रमणास कारणीभूत ठरु शकते.

UTI Training In School
Blood Cancer Symptoms : सतत थकवा येणे, वजन कमी होणे असू शकतो ब्लड कॅन्सरचा आजार? चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

3. बाथरूम ब्रेक द्या :

सतत लघवी येत नसली तरी देखील बाथरुम ब्रेक घ्या. यामुळे मूत्राशय वेळोवेळी रिकामे करा ज्यामुळे जिवाणू तयार होण्याचा धोका कमी होईल.

4. हायड्रेशन:

दिवसभरात मुलांना पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यास सांगा. सतत हायड्रेट राहा ज्यामुळे मूत्रमार्गाचे कार्य निरोगी राहाण्यास मदत होईल.

4. युटीआयबाबात शिक्षण महत्वाचे

1. यूटीआय प्रतिबंध:

मुलांना वेळोवेळी शौचालय स्वच्छतेबाबत माहिती द्या. या पद्धतींचे ज्ञान हा संक्रमणाचा धोका कमी करू शकते.

UTI Training In School
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

2. गैरसमजूती दूर होतील:

शाळांमधील UTI आणि शौचालयाच्या स्वच्छतेबद्दल मत मांडा. त्यांच्या मनात असणाऱ्या गैरसमजांना दूर करा.

4. भविष्यातील धोका टाळणे शक्य:

योग्य वयात युटीआयबद्दल माहिती मिळाली की, त्यांच्या मनात जागरुकता निर्माण होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com