राज्यात यंदा मान्सून मे महिन्यात दाखल झाला असून जुलै महिन्याच्या सुरुवातीस पावसाने चांगलाच जोर धरला आहे. महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरात रविवार पासून पावसाची रिमझिम कायम आहे. या पावसाने नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता नागपूर जवळच्या लाव्हा शिवारात खोल खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन १५ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत कच्छी विसा मैदानात गणेश विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात खेळताना ७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनेने नागपूर शहर हादरले आहे.
नागपुरामधील लाव्हा शिवारात दोन तरुण मुलं गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जुन्या खदानीच्या खोल खड्ड्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात पोहण्यासाठी दोन १५ वर्षीय मुले गेली होती. या दरम्यान त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या मुलांची नाव धीरज नानवरे आणि नैतिक वानखेडे अशी आहेत. तर दुसरीकडे नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत कच्छी विसा मैदानात एका कोपऱ्यात गणेश विसर्जनाचा कायमस्वरूपी कृत्रिम तलाव उभारल होता. त्यामध्ये भरलेल्या पाण्यात बुडून महेश थापा या ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे नागरिकांनी महापालिकेच्या कामासंदर्भात रोष व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेनंतर नागपूर शहर हादरलं आहे.
नागपुरात रविवारपासून सलग चौथ्यादिवशी पावसाचा जोर कायम असल्याने नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ६ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ८ हजार ८८६ शेतकरी बाधीत झाले असून नागपूर जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा ४०० कोटीहून अधिक असल्याचा कृषिविभागाने अंदाज वर्तवला आहे. सर्वाधिक नुकसान कापूस, सोयाबीन पिकाचे झाले. त्या खालोखाल तूर,भात पिकाचे नुकसान झाले. असा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
पुरामुळे नदी आणि नाल्याजवळ असणाऱ्या जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्याची जमीन पीक घेण्याजोगी राहिली नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांच्या नुकसानीसोबत अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील काही गावात घराची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही गावात रस्ते वाहून गेलेत. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून बाधीत शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्याची मागणी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.