Modi Cabinet : खासदार शिंदेंना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार? राजकीय चर्चांवरील उत्तरानं भुवया उंचावल्या

Modi Cabinet Expansion : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यात एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर स्वतः शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Modi Cabinet : एकनाथ शिंदे दिल्लीत, श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्रिपद?; राजकीय चर्चांवर खासदारांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या
Shrikant Shinde and Eknath Shinde saam tv
Published On

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ (Modi Cabinet Expansion) विस्ताराची चर्चा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या उठलेल्या वावड्या, त्यावर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, विरोधकांचे दावे; दुसरीकडे शिंदेसेनेत नुकतेच प्रवेश केलेल्या खासदारांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आणि श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता अशा वावटळी महाराष्ट्रासह देशातील राजकारणात उठल्या आहेत. असं असताना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेवर स्वतः खासदार शिंदेंनी उत्तर दिलंय. त्यांनी एका वाक्यात दिलेल्या उत्तरानं या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी, राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडलेले दिसू शकतात. शिंदेसेनेतील काही नेत्यांची केंद्रात वर्णी लागू शकते, असेही बोलले जात आहे. शिंदेसेनेच्या वाट्याला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळू शकते, अशीही चर्चा आहे. शिंदे हे दिल्लीला जाणार असून, त्यांच्यासोबत पक्षाचे खासदारही असतील, असे सांगितले जात आहे.

श्रीकांत शिंदेंचे एकाच वाक्यात उत्तर

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातही तशी चर्चा सुरू आहे. केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांवर स्वतः श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत शिंदेंना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. त्यावर राजकारणात जर-तरच्या चर्चा तर होतच असतात. एकनाथ शिंदे यांना दिल्लीत बरीच महत्वाची कामेही असतात, असे उत्तर देत शिंदेंनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्व

एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे (Operation Tiger) ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे. एकीकडे कॅबिनेट मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव चर्चेत आहे, तर दुसरीकडं राज्यमंत्रिपदाच्या शर्यतीत शिंदेंच्या खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिंदे पिता-पुत्र दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर, शिंदेंच्या कोणत्या खासदारांना मंत्रिपद मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

Modi Cabinet : एकनाथ शिंदे दिल्लीत, श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्रिपद?; राजकीय चर्चांवर खासदारांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या
Cabinet Expansion: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख समोर, शिंदे खासदारांसह दिल्ली दौऱ्यावर; कुणाला मिळणार मंत्रिपद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com