बदलापुरात चोरट्यांनी मोबाईलचा उभा टॉवरच केला गायब! कंपनीची पोलिसात धाव

इमारतीवर जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून एअरसेलचा मोबाईल कंपनीचा टॉवर लावण्यात आला होता.
Badlapur News
Badlapur News Saam TV
Published On

बदलापूर : बदलापुरात एका इमारतीवरून चक्क मोबाईलचा टॉवर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल टॉवर चोरीला गेल्याची बाब वर्षभराने लक्षात आल्यानंतर कंपनीकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूर पूर्वेच्या अतिथी हॉटेलजवळ श्री अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीवर जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून एअरसेलचा मोबाईल कंपनीचा टॉवर लावण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी एअरसेल कंपनी बंद पडल्यानंतरही हा टॉवर तसाच होता. (Latest Marathi News)

Badlapur News
Wardha News : ४३ लाखांची वीजचोरी उघड; 13 जणांविरुद्ध गुन्हा

मात्र २०२२ पासून कंपनीचं या टॉवरकडे लक्ष नसल्याची बाब हेरत कुणीतरी हा टॉवरच गायब केला. फक्त टॉवरच नव्हे, तर शेल्टर रूम, जनरेटर, बॅटरी बँक, एसी, केबल वायर असं तब्बल १२ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला.

Badlapur News
संक्रांतीच्या दिवशी काळाचा घाला; नायलॉन मांजाने गळा कापल्याने लहानग्याचा मृत्यू

कंपनीच्या ही बाब वर्षभराने लक्षात येताच पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार बदलापूर पूर्व पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आता हा टॉवर नेमका कुणी नेला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com