Mobile Blast: दुचाकीवरून जाताना खिशातील मोबाइलचा स्फोट; शिक्षकाचा मृत्यू

Gondia Mobile Blast: दुचाकीवरून जाताना मोबाइलचा स्फोट झाला. यात शिक्षकाचा मृत्यू झालाय.
Mobile Blast
Gondia Mobile BlastSaam Tv
Published On

मोबाईल वापरणाऱ्यांनो सावधान, जर तुम्हीही मोबाईलचा वापर करत असाल तर सावधान. मोबाईलचा स्फोट होऊन एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियातील सिरेगाव टोला येथे घडलीय. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना काळजी घ्या. दुचाकीवरून जातांना मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगाव/टोला येथे घडली.

मोबाईलच्या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव सुरेश संग्रामे असे आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव नत्थु गायकवाड आहे. हे दोघेही मित्र असून ते दुचाकीवरून जात होते. खिश्यात मोबाइलाचा स्फोट झाला. स्फोट होऊन कपड्याला आग लागली यात संग्रामे यांचे शरीर भाजल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तर मृतक सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.

मोबाईलच्या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव सुरेश संग्रामे असे आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव नत्थु गायकवाड आहे. हे दोघेही मित्र असून ते दुचाकीवरून जात होते. खिश्यात मोबाइलाचा स्फोट झाला. स्फोट होऊन कपड्याला आग लागली यात संग्रामे यांचे शरीर भाजल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचार करत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तर मृतक सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.

सध्याच्या काळात स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही सकाळी उठल्यावर स्मार्टफोनमधील मेसेज पाहण्यापासून होते. तर रात्री बेडवर झोपल्यावर सुद्धा फोन हातातच असतो. याच स्मार्टफोनच्या माध्यमातून केवळ फोन कॉल्स नाही तर मेसेज, व्हिडिओ पाठवणे, व्हिडिओ शूट करणे, फोटो क्लिक करणे इतकेच नाही तर आर्थिक व्यवहार सुद्धा करता येतात. त्यामुळेच स्मार्टफोन हा मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे. पण हा स्मार्टफोन वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Mobile Blast
Maharashtra Election : मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला हायकोर्टात चॅलेंज, याचिकेत काय काय म्हटलं?

अन्यथा जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना भंडाऱ्यात घडली आहे. सुरेश संग्रामे (वय, ५५) असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. तर, नत्थु गायकवाड (वय, ५६) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे दोघेही डारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुरेश आणि नत्थु हे गुरुवारी संध्याकाळी नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी जात असताना सुरेश यांच्या खिशात असलेल्या फोनचा अचानत स्फोट झाला. या घटनेत सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर, नत्थु हे गंभीर जखमी झाले. नत्थु यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Mobile Blast
Panvel News : इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी चोरी; शटर तोडून युवकाने चोरले ५४ मोबाईल

फोनचा स्फोट होण्याची मुख्य करण असली तरी बॅटरीमध्ये अनेकदा बिघाड होत असतो. लिथियम-आयन बॅटरी, जी बर्याचदा मोबाइल फोनमध्ये वापरली जाते, एक सकारात्मक टर्मिनल, एक नकारात्मक टर्मिनल (कॅथोड आणि अॅनोड) आणि एक इलेक्ट्रोलाइट असते. बॅटरीममध्ये काही खराबी आल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. ज्यामुळे आयन थेट कॅथोड आणि अॅनोडदरम्यान जाते. त्यामुळे बॅटरीच्या आतील तापमान आणि दाब वाढतो. ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com