Chhatrapati Sambhajinagar News : राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी खबरदारी; ५ ते ६ मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात

Raj Thackeray Chhatrapati Sambhajinagar Visit: मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सहा ते सात मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Raj Thackeray Saam Tv
Published On

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मनसेचं महाराष्ट्र मिशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर राज ठाकरे यांचे दौरे सुरू झाले आहेत. आज राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील ६-७ मराठा आंदोलकांना (Maratha Protesters) ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी साम टीव्हीला ही माहिती दिलीय.

राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

धाराशिव, नांदेड आणि बीडमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी मराठा समाजातील, मराठा संघटनेतील काही कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला होता. राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला (MNS Leader Raj Thackeray) होता. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी खबरदारी म्हणून ताब्यात घेतलंय. शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जावून शहर पोलीस कारवाई करीत असल्याची माहिती मिळतेय.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचं महाराष्ट्र मिशन

मनसे प्रमुख राज ठाकरे २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान विदर्भ करणार दौरा आहेत. विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे काही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचीरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळतेय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar News) राज ठाकरेंच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली असल्याचं दिसत आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
VIDEO: सुपाऱ्या फेक, चले जावच्या घोषणा, गोंधळ आणि राडा! जरांगेंच्या बालेकिल्ल्यात Raj Thackeray यांच्या ताफ्यासमोर काय घडलं?

दौऱ्यासाठी जय्यत तयारी

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विदर्भातील संपूर्ण ६२ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे दौरा करणार असल्याची माहिती (Maharashtra Politics) मिळतेय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे लागले आहेत. दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करत असल्याची माहिती मिळतेय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Raj Thackeray Vidarbha Tour : ठरलं! राज ठाकरे विदर्भाचा दौरा करणार, कोणत्या जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर करणार? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com