Raj Thackeray: ...नाहीतर डोक्यावर हात मारून घ्यावा लागेल; महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ आणि मराठा... सर्वच मुद्द्यांवर राज ठाकरेंनी केलं सावध

MNS Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना आयोजित तिसरी वार्षिक सहकार परिषद सध्या कर्जतमध्ये सुरू आहे. नेरळजवळील धामोते येथे असलेल्या डिस्कव्हर रिसोर्टमध्ये ६ आणि ७ जानेवारी असे हे शिबिर होत आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv
Published On

विनय म्हात्रे, मुंबई|ता. ६ जानेवारी २०२४

Raj Thackeray Speech:

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना आयोजित तिसरी वार्षिक सहकार परिषद सध्या कर्जतमध्ये सुरू आहे. नेरळजवळील धामोते येथे असलेल्या डिस्कव्हर रिसोर्टमध्ये ६ आणि ७ जानेवारी असे हे शिबिर होत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील सद्यस्थितीतील राजकारण, सहकार क्षेत्राबाबत परखड भाष्य केले.

काय म्हणाले राज ठाकरे?

"राज्यातील आत्ताची चळवळ ही सहारा चळवळ आहे. एकमेकांना सहारा देऊन सरकार चळवळ सुरू आहे. महाराष्ट्रात 2 लाख 22 हजार सहकार संस्था आहेत. त्याच्या खालोखाल गुजरात आहे म्हणून महाराष्ट्रावर डोळा आहे. अमुलसाठी महानंदा डेरी गिळंकृत करायचे प्रयत्न चाललेत..." असा गंभीर आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

राजकारण्यांनी स्वाभिमान गहाण टाकला...

"पूर्वी लढून जमिनी घेत होते. युद्धामुळे कळायचं जमिनी घ्यायला आलेत. पण आता हे राजकारणी कधी जमिनी घेताहेत हे माहिती ही पडत नाही. आपल्या बाजूला काय होतंय ते समजून घ्या नाहीतर डोक्यावर हाथ मारून घ्यावं लागेल. राजकारण्यांनी स्वाभिमान गहाण टाकला, तुम्ही टाकू नका, माझा महाराष्ट्र सैनिक कधीही स्वाभिमान गहाण टाकणार नाही.." असे आवाहनही राज ठाकरेंनी यावेळी केले.

Raj Thackeray
Sindkhed Raja Rajwada: राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

विदर्भाचाही तुकडा पाडतील...

"महाराष्ट्राची चळवळ वाढली पाहिजे. ती तुम्ही वाढवा, आणि जी महाराष्ट्र उध्वस्त करणारी चळवळ उध्वस्त करून टाका. राज्यकर्ते मुंबईवरही हाथ घालतील. विदर्भाचा ही तुकडा पाडतील, हे ७० वर्षांपासून सुरू आहे. आपण जातीपाती साठी भांडातोय हे सर्व चालवलं जातंय.. अशी टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray
Viral Video : विमान हवेत उडत असताना खिडकीच तुटली, त्यानंतर जे घडलं पाहून थरकाप उडेल, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com