पुण्यानंतर औरंगाबादेत मनसेत नाराजी; सोशल मीडियाद्वारे राज ठाकरेंकडे गाऱ्हाणं

'औरंगाबादमधील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे मनसेतील वरिष्ठांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी मनसेच्या इंजिनमधून उतरण्याचा निर्णय घेतला आहे.'
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV
Published On

औरंगाबाद : राजसाहेब जसा पुण्याचा तिढा सोडवला तसाच औरंगाबादचाही (Aurangabad) सोडवा, असं औरंगाबादच्या मनसैनिकांनी सोशल मीडियावर कँपेनिंग सुरू केलं आहे. मुंबईतील पाडवा मेळाव्यानंतर पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे नाराज झाले होते, त्यांची नाराजी स्वतः राज ठाकरेंनी दूर केली आहे.

वसंत मोरे आणि राज ठाकरेंमध्ये (Vasant More and Raj Thackeray) झालेल्या भेटीनंतर हा नाराजीचा तिढा सुटला आहे. पण ज्याप्रमाणे पुण्याचा तिढा सोडवला तसाच औरंगाबादमधील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्याबाबतही राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा अशी मागणी करत औरंगाबादच्या मनसे कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर (Social Media) कँपेनिंग करण्यात येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते या दौऱ्यावेळी त्यांनी सुहास दाशरथे यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेतले होते. मात्र, त्यानंतरही आपल्याला न्याय मिळेल या आशेने दाशरथे मनसेतच राहिले.

मात्र, मनसेतील वरिष्ठांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी मनसेच्या इंजिनमधून उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील घडामोडी पाहता ज्याप्रमाणे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याबाबत राज ठाकरेंनी निर्णय घेतला, तसाच न्याय दाशरथे यांना देण्यात यावा अशी मागणी दाशरथे समर्थकांकडून केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com