Saroj Ahire NCP: नेत्यांपेक्षा चर्चा चिमुकल्या पाहुण्याची! महिला आमदाराची अडीच महिन्याच्या बाळासोबत अधिवेशनाला हजेरी

नागपूर अधिवेशनात नेते मंडळींच्या गर्दीत या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
saroj ahire NCP
saroj ahire NCPSaamtv
Published On

Maharashtra Winter Session : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यभरातील, आमदार, मंत्री हजर झाले आहेत. नेते मंडळींच्या गर्दीत या एका चिमुकल्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. अधिवेशनासाठी आलेला हा चिमुकला पाहुणा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? हिवाळी अधिवेशनासाठी महिला आमदार आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला घेवून दाखल झाल्या आहेत. ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

saroj ahire NCP
Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या रडारावर असलेल्या कुर्ल्यातील 'त्या' तीन बहिणींना अटक

राज्यभरातील नेते नागपुरात (Nagpur) होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला आमदार सरोज अहिरे यांच्या अडीच वर्षाच्या बाळाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. याबद्दल बोलताना त्यांनी "माझ्यासारख्या करोडो महिला ज्या शिक्षिका आहेत, नर्स आहेत त्या आपल्या बाळाला घेवून काम करत असतात. माझ्या मतदार संघातील प्रश्न सुटले पाहिजेत, ते मांडले पाहिजेत यासाठीच मी माझ्या बाळाला घेवून आली आहे. माझ्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत," अशी प्रतिक्रिया सरोज अहिरे यांनी दिली आहे.

saroj ahire NCP
MPSC Student Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन, प्रमुख मागण्या काय आहेत?

सरोज अहिरे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवराळी मतदारसंघाच्या आमदार आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये चांगलेच घमासान पाहायला मिळाले. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com