MPSC Student Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन, प्रमुख मागण्या काय आहेत?

MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. जवळपास हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत.
MPSC Student Protest In Pune
MPSC Student Protest In PuneSAAM TV
Published On

MPSC Student Protest In Pune : राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी एमपीएससी (MPSC) विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास एक हजार विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, पण त्यासाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. (MPSC)

नवीन पॅटर्न २०२५ मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळू शकतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून होत आहे. (Protest)

MPSC Student Protest In Pune
MPSC : MPSCकडून अभ्यासक्रमात बदल, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

MPSC विद्यार्थ्यांच्या काय आहेत मागण्या?

राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा जून २०२३ मध्ये आहे. लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यात पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. त्यामुळे पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी किमान ५ ते ६ महिने वेळ मिळण्याची गरज आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

अभ्यासक्रम जसाच्या तसा यूपीएससीचा कॉपी पेस्ट आहे. एमपीएससीच्या मुलांना अजून संदर्भसाहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे.

MPSC Student Protest In Pune
MPSC STUDENT: त्या १११ उमेदवारांचं भवितव्य टांगणीला? पाहा नेमकं काय आहे प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com