MLA Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचा प्रताप; वाढदिवसाचा केक तलवारीने कापला अन् तलवारीनेच सगळ्यांना भरवला

MLA Sanjay Gaikwad News : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसाची केक तलवारीने कापला आणि तो सर्वांना तलवारीने भरवला, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSaam Digital
Published On

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडलेत...यंदा हा वाद तलवारीचा आहे...आमदार संजय गायकवाडांनी तलवारीनं केक कापलाय..मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत...तर त्यावर त्यांनी अकलेचे तारे तोडलेत...काय केलंय शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी पाहूया...

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय.. आता आमदार संजय गायकवाडांनी नवा वाद ओढवून घेतलाय.. त्याला निमित्त ठरलं आहे ते त्यांच्या लेकाचा वाढदिवस. त्यांनी मुलाच्या वाढदिवसाला आणलेला केस हा तलवारीने कापला. बरं ते त्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तो केकही लेकाला तलवारीनंच भरवला. टीकेची झोड उठ्यानंतर आमदार साहेबांनी याचं निर्लज्जपणे समर्थनही केलं.

राज्यात सर्रास रील बनवण्याच्या नादात तरुण तलावारीनं केक कापतात..सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र आता शिंदेंच्या शिलेदारानं तलवारीनं केक तर कापलाच. मात्र पत्नीसह मुलालाही तलवारीनेच केक भरवला. एवढंच नव्हे तर त्यांनी याचं समर्थन करताना थेट पोलिस परेड आणि ऑलिम्पिकमधल्या तलवारबाजी, रायफल शूटिंगचं उदाहरण देऊन अकलेचे तारेही तोडलेत.

MLA Sanjay Gaikwad
Mumbai Crime News : स्वातंत्र्यदिनी दारू पिऊन पोलीसांशी हुज्जत, अर्वाच्य भाषेत शिविगाळ; पोलिसांनी दाखवला इंगा

आमदार हे लोकप्रतिनिधी असतात..राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची...मात्र आमदारच जर सर्रासपणे कायद्याची लक्तरं वेशीला टांगत असतील तर गुन्हेगारांना चाप कसा बसणार? विधानसभेला अवघे काही महीने उरलते...त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकप्रतिनिधींना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याची गरज तर आहेच...मात्र मुख्यमंत्रीही आपल्या आमदारावर काय कारवाई कऱणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

MLA Sanjay Gaikwad
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आठवा वेतन आयोग लागू होणार?, पेन्शनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com