Ravi Rana vs Bacchu Kadu : मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही; राणांचा बच्चू कडूंवर प्रहार!

मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही' असं म्हणत राणा यांनी बच्चू कडू यांना चिमटा काढला
Ravi Rana vs Bacchu Kadu
Ravi Rana vs Bacchu KaduSaam TV
Published On

अमर घटारे, साम टिव्ही

Ravi Rana vs Bacchu Kadu : बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला जाण्यावरून आमदार बच्चू कडूंवर निशाणा साधलाय. 'मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही' असं म्हणत राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांना चिमटा काढला. 'ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया' असा टोलाही राणा यांनी कडूंना (Bacchu Kadu) लगावला आहे. अमरावतीतील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात रवी राणा बोलत होते. (Bacchu Kadu vs Ravi Rana News)

Ravi Rana vs Bacchu Kadu
Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या 'प्रहार'ला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. आता राणा दाम्पत्यांची दहीहंडी दणक्यात सुरू आहे. नुकताच अमरावतीच्या परतवाडा येथे युवा स्वाभिमान पक्षाचा दहीहंडी कार्यक्रम पार पडला. या दहीहंडी सोहळ्याला सिने अभिनेते शक्ती कपूर सह श्रेयस तळपदे यांनी हजेरी लावली.

या सोहळ्याला संबोधित करताना आमदार रवी राणा यांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूवर निशाणा साधला. "मी गुवाहाटी ला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैया, पैसे सबका रुपया" म्हणत त्यांनी टीका केली आहे. याशिवाय रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरा शिपाई असल्याचे देखील म्हटलं आहे. (Bacchu Kadu Todays News)

Ravi Rana vs Bacchu Kadu
Osmanabad News : स्वच्छतागृहातच महिलेची डिलिव्हरी; आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

एकीकडे शिंदे गटात सामील होण्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० खोकी मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे आता रवी राणा यांनीही या पैशांवरून बच्चू कडूंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राणांनी केलेल्या या प्रहारानंतर आता बच्चू कडू काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विशेष बाब म्हणजे, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी “गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, ५० खोके एकदम ओके” अशा घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला होता. “आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?” असा सवाल त्यावर बच्चू कडूंनी विरोधकांना केला होता. या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं बच्चू कडू म्हणाले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com