Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधवांच्या जीवाला धाेका ? घरावर हल्ल्याचा प्रयत्न, सुरक्षा व्यवस्था काढली ?

अचानक आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्याची चर्चा.
Bhaskar Jadhav , Sindhudurg ,
Bhaskar Jadhav , Sindhudurg , Saam Tv
Published On

- जितेश कोळी

Bhaskar Jadhav : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न हाेता की काय अशी शंका आज (बुधवार) सकाळच्या सुमारास उपस्थित झाली आहे. आमदार जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. (bhaskar jadhav latest marathi news)

गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये राडा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. (Maharashtra News)

Bhaskar Jadhav , Sindhudurg ,
Sindhudurg : शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटणार ? राणेंचे 'ते' वक्तव्य आमदार नाईकांच्या जिव्हारी

माजी खासदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांची नक्कल केली हाेती. यावेळी जाधव यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळ येथील मेळाव्यात या टीकेला उत्तर देताना राणेंसह भाजपावर टीका केली होती. (Breaking Marathi News)

Bhaskar Jadhav , Sindhudurg ,
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात खेडच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

दरम्यान आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजपा विरोधातील वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अचानक सुरक्षा व्यवस्था काढण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Bhaskar Jadhav , Sindhudurg ,
Diwali Festival 2022 : 'या' फटाक्यांच्या विक्रीवर बंदी; जाणून घ्या डेसिबलची मर्यादा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com