नवनीत तापडिया
Ambadas Danve News: ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्य चर्चेत आलं आहे. 'उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत आहे हा शब्द मला मान्य नाही. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते असून जनतेला हे कळाले आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. (Latest Marathi News)
अंबादास दानवे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दानवे उद्धव ठाकरेंवर म्हणाले, ' 'उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत आहे हा शब्द मला मान्य नाही. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते असून जनतेला हे कळाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला हे सरकार घाबरत आहे म्हणून त्यांच्यात निवडणुका घेण्याची हिंमत नाही'.
आगामी मनपा निवडणुकींवर भाष्य करताना दानवे म्हणाले, 'सहानुभूतीवर आम्ही जगणारे नाही. आमच्या कामावर आणि या सरकारच्या अपयशावर हे सरकार अपयशी सरकार आहे. हे सरकार बेकायदेशीर सरकार आहे. हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत नाही'.
'महाराष्ट्राला देशोधडीला लावत आहे, महागाई रोखू शकत नाही, हे सरकार गुन्हेगारी रोखू शकत नाही, बेरोजगाराला न्याय देऊ शकत नाही या विषयावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला सहानुभूतीवर निवडणुका लढवण्याची गरज नाही, असेही दानवे म्हणाले.
नाशिकमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर भाष्य करताना दानवे म्हणाले, 'संजय राऊत यांना गुन्हा दाखल झाल्याने काही फरक पडत नाही. ते जेलमध्ये जाऊन आलेले आहे'.
नितेश राणे यांच्या टीकेला दानवे यांनी जोरदार प्रत्यत्तर दिलं. 'आम्ही आमच्या जागेचं बघून घेऊ, तुमची जागा कुठे आहे हे तुम्ही बघा, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी सडेतोड उत्तर दिलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.