Miraj Crime News : पोलिसांची मिरजेत माेठी कारवाई; पाच युवक अटकेत

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, सुभाष पाटील, उदय कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड, विनायक झांबरे, अमोल आवळे यांनी केली.
sangli, Sangli Crime News, Miraj Police.
sangli, Sangli Crime News, Miraj Police.Saam Tv

सांगली : दराेड्याच्या तयारीत असलेल्या पाच युवकांना (youth) मिरजच्या (miraj) महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली आहे. मिरज पाेलीसांना (miraj police) मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. (sangli latest marathi news)

याबाबतची अधिक माहिती अशी : मध्यरात्रीच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेले पाच तरुण हे रेल्वे पोलीस लाईन जवळ दुकानांच्या आडोश्याला बसले होते. त्यांच्याकडे कटावणी, स्क्रू ड्राईव्हर पक्कड, मिरची पूड असे साहित्य असल्याची गोपनीय माहिती मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती.

sangli, Sangli Crime News, Miraj Police.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने रिक्षा चालकाकडून घेतले एक हजार रुपये; गुन्हा दाखल

त्यानंतर पोलीसांचे एक पथक घटनास्थळी गेले. तेथे त्यांनी कानाेसा घेत छापा टाकला. या छाप्यात पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चाैकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडील कटावणी, स्क्रू ड्राईव्हर, पक्कड तसेच मिरची पूड आणि दोन मोटरसायकल असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

sangli, Sangli Crime News, Miraj Police.
हद्दच झाली राव! खासदार, आमदारांनी बाेलाविलेल्या बैठकीत अधिकारी खेळत हाेते कॅंडी क्रश

या प्रकरणी पाेलीसांनी श्रीशैल राजमाने ,अनिस अल्ताफ सौदागर ,हनिफ रजाक शेख, रियाज बडेसाहेब शेख व एक अल्पवयीन मुलास अटक केली. अधिक चौकशी केली असता यातील श्रीशैल राजमाने हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

sangli, Sangli Crime News, Miraj Police.
FIFA U-17 Women's World Cup 2022 : फिफा महिला विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; नवी मुंबईत रंगणार अंतिम सामना

त्याने संबंधित आदेशाचा भंग केल्याने त्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान पाच युवकांना अटक केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, सुभाष पाटील, उदय कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड, विनायक झांबरे, अमोल आवळे यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com