Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ, कोर्टात याचिका दाखल

Maharashtra Politics: औरंगाबाद पश्चिम विधानसभा (१०८) मतदारसंघात मंत्री संजय शिरसाट यांनी कथितपणे भ्रष्ट मार्गांचा वापर करून निवडणूक जिंकली. या विरोधात पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे.
Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ, कोर्टात याचिका दाखल
Published On

औरंगाबाद पश्चिम विधानसभा (एससी राखीव) मतदार संघाचे निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडणूक जिंकली. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या निवडणूक याचिकेत न्यायमूर्ती के. सी. संत यांनी प्रतिवादी राज्य शासन, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा (१०८) मतदार संघाच्या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार मंत्री संजय शिरसाट यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडणूक जिंकली. त्याविरोधात पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत ही निवडणूक याचिका दाखल केली. निवडणूक काळात सातारा देवळाई भागात माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हिवाळे हे मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे वाटप करुन शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ, कोर्टात याचिका दाखल
Santosh Deshmukh Case: सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खोलात? मनोज जरांगेंच्या मागणीनं राजकारण तापलं, पाहा स्पेशल रिपोर्ट

निवडणूक आयोगाच्या पथकाने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संजय शिरसाट यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात, मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप झाला असून, शिवसेनेला राजकीय फायदा मिळावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. यासंदर्भात जवाहरनगर पोलिस ठाण्यात संजय शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोगाच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ, कोर्टात याचिका दाखल
SSC-HSC Exam: ड्रोनच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर नजर, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

त्याचप्रमाणे निवडणूकीच्या दिवशी वाळूज भागात विरोधी उमेदवार राजू शिंदे यांना मतदान होत असल्याने शिरसाट यांनी पोलिसांना सांगून लाठीचार्ज करण्यास सांगीतले, याची तक्रार शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. रिप्रेझेंटेंशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम १२५ अन्वये संजय शिरसाट हे मतदारांना पैसे वाटप करुन, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी शिंदे यांनी ॲड सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com