Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीमुळे 'आनंद' हिरावला? गणेशोत्सवात नाही मिळणार 'आनंदाचा शिधा'

Anandacha Shidha : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ४५,००० कोटी रुपयांची निधी दिला जाणार आहे. ज्यामुळे गणेशोत्सवात आनंदाचा शिधा दिला जाणार नाही.तिजोरीत निधीची कमतरता भासत असल्याचं मंत्री छगन भुजबळ म्हणालेत.
Ladki Bahin Yojana
Anandacha Shidhasaam tv
Published On

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची तिजोरी रिकामी झाल्याची चर्चा असताना या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलीय. महायुती सरकारची महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजनेमुळे गोर-गरिबाच्या जीवनातील 'आनंद' जाणार आहे. हो लाडकी बहीण योजनेमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाहीये. याची कबुली खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. (Chhagan Bhujbal confirms no Anandacha Shidha this Ganeshotsav due to Ladki Bahin Yojana expenses)

लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही, असं राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणालेत. आम्ही आता राज्य सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या योजनांच्या निधी बाबत मागेपुढे होतं असले तरी आम्ही निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू असेही छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणे आनंदाचा शिधा ही योजना सुरू केलीय. हेदेखील राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे. राज्यातील गरीबांना सणासुदीच्या काळात केवळ १०० रुपयांमध्ये चार वस्तू या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात. राज्यातील लाडक्या बहिणीमुळे गरिबांचा हा आनंद हिरावला जाणार आहे. राज्यातील तिजोरीतील एकदम ४५ हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी द्यावे लागणार आहेत. याचा परिणाम इतर योजनांवर पडतोय.

आनंदाचा शिधा द्यायचा असेल तर त्यासाठी दोन ते तीन महिने आधी टेंडर काढावे लागते. आता हे शक्य नाहीये. आनंदाचा शिधा आत्ता मिळणार नाहीये. त्यासाठी टेंडर काढावं लागतं आणि त्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी लागत असतो. वर्षाला शिवभोजन थाळीसाठी १४० कोटी रुपये तर आनंदाचा शिधा साठी ५५० कोटी रुपये लागत होते.

आनंदाचा शिधा योजनेतून राज्यातील रेशनकार्ड धारकांना सणासुदींच्या काळात फक्त शंभर रुपयात काही जीवनावश्यक वस्तू देण्यात येत होत्या. यात एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक लिटर पामतेल देण्यात येते. आता हा शिधा यंदा देण्यात येणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती. २०२२ च्या दिवाळीला पहिल्यांदा ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com