Chhatrapati Sambhajinagar: मोठी बातमी! औरंगाबादच्या नामांतराला MIM चा विरोध; आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो

औरंगाबादच्या नामांतराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे...
MIM Protest Aurangabad
MIM Protest AurangabadSaamtv
Published On

Imtiaz Jaleel Protest: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला अधिकृत परवानगी दिल्यानंतर या निर्णयाविरोधात खासदार इम्तियाज जलील आजपासून बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे. या उपोषणाच्या पहिल्या दिवशीच छत्रपती संभाजीनगर नावाचा विरोध करीत औरंगजेबाचे फोटोही दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे नामांतराचा वाद आता चांगलाच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (Latest Marathi Update)

MIM Protest Aurangabad
Accident News: अवैध मुरूम वाहणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक, नांदेडमधील पत्रकाराचा जागीच मृत्यू; घातपात असल्याचा संशय

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र याच निर्णयावरुन आता राजकारण तापले आहे. एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत आजपासून आंदोलनला सुरूवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवल्याचीही माहिती समोर आली आहे.

मात्र "ज्या व्यक्तींनी फोटो झळकवले आहेत, त्याचा एमआयएम किंवा माझ्याशी काही संबंध नाही. कोणीतरी आमचा आंदोलन मोडून काढावं यासाठी केलेला प्रयत्न आहे," असे स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे.

MIM Protest Aurangabad
Sharad Pawar Exclusive: अशी झाली राजकारणात एन्ट्री; खुद्द शरद पवारांनी सांगितला किस्सा...

तसेच ज्या व्यक्तीने आंदोलनामध्ये हे फोटो झळकवले आहेच, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी साम टीव्ही शीच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी या आंदोलनाबद्दल बोलताना, "माझे नाव तुम्ही शहराला देऊन मला मोठे करा असे संभाजी महाराजांनी सांगितले होते का? ते महापुरूष आहेत यात काहीही दुमत नाही. त्यांचा आदर करण्यात कोणताही वाद नाही पण त्याबाबत सुरू असणाऱ्या राजकारणाविषयी आक्षेप आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे... (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com