Accident News: अवैध मुरूम वाहणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक, नांदेडमधील पत्रकाराचा जागीच मृत्यू; घातपात असल्याचा संशय

जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेवून या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी पत्रकार संघटनेकडून केली आहे.
Accident News
Accident NewsSaam tv

संजय सुर्यवंशी, नांदेड...

Nanded News: राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावर गाडी घालून हत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. नांदेड येथील पत्रकार संजय कंधारकर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे . अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या टिप्परने कंधारकर यांना पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

Accident News
Sharad Pawar Exclusive: अशी झाली राजकारणात एन्ट्री; खुद्द शरद पवारांनी सांगितला किस्सा...

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडमधील पत्रकार संजय कंधारकर हे आपल्या दुचाकीवरुन कंधारमधून लोह्याकडे जात होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या मुरुमच्या टिप्परने संजय कंधारकर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय कंधारकर यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे धडक दिलेल्या टिप्परमधून अवैधरित्या मुरुमची वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Accident News
Chandrashekhar Bawankule: 'मला वाटतं त्यांनी..'; बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक सल्ला; कसबा निकालावरून साधला निशाणा

तसेच कंधारकर यांचा अपघात की घातपात याबद्दलही उलटसुलट चर्चा नांदेड जिल्ह्यात होताना दिसत आहे. दरम्यान, संजय कंधारकर यांच्या अपघाताची चौकशी करावी, अशी केली जात आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेवून या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी पत्रकार संघटनेकडून केली आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com