MHADA Housing: घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा संपूर्ण राज्यात 13,000 घरे बांधणार

MHADA To Built 13,000 Houses: म्हाडा सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न पूर्ण करणार आहे. संपूर्ण राज्याभरात म्हाडाकडून घरे उभारण्यात येणार आहेत.
MHADA Housing: घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा संपूर्ण राज्यात 13,000 घरे बांधणार
MHADA HousingYandex

सर्वसामान्याच्या आयुष्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वपनातलं हक्काच घर होणं. आता हक्काच्या घराचं स्वप्न आता म्हाडाच्या माध्यमातू पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून तब्बल 13043 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या घरांच्या बांधकामासाठी तब्बल 8 हजार 310 कोटींची तरतूद करण्यात आलीय. ही घरे मुंबई, कोकण,संभाजीनगर,नाशिक आणि अमरावती या प्रादेशिक मंडळात उभारली जाणार आहेत.

कुठे किती घरे उभारण्यात येणार

मुंबईत- 3660, कोकणात- 5122, तर पुणे -1506, नागपूर-1076, छ. संभाजीनगर- 590, नाशिक-1097 घरे बांधण्यात येणार आहे. सर्वसामान्य व्यक्ती आपल्या पोटाला चिमटा मारुन मारुन पै-पै जोडत कमाईचा एक मोठा हिस्सा घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्च करत असतो. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण आहे. साधारणपणे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर,अशा शहरी भागात मोठ्या प्रमाणात घरांची विक्री होतं असते. त्या ठिकाणी लागलेल्या लॉटरीला चांगल्या प्रमाणत प्रतिसाद सुद्धा दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com