MHADA: म्हाडाची बंपर लॉटरी, तब्बल १४१८ घरांसाठी सोडत, कुठे निघणार?

MHADA Home Lottery: म्हाडा लवकरच १४१८ घरांसाठी लॉटरी काढणार आहे. छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक मंडळाअंतर्गत ही लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये सदनिका आणि भूखंडासाठी सोडत निघणार आहे.
MHADA
MHADASaam Tv
Published On

म्हाडाच्या नवीन घरांची सोडत लवकरच निघणार आहे. म्हाडाच्या विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर (Sambhaji Nagar) व नाशिक (Nashik) मंडळाच्या संभाजीनगर, बीड व नाशिक शहरामध्ये गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवीन घरांची सोडत निघणार आहे. या योजनेअंतर्गत १४१८ फ्लॅट्स व भूखंडासाठी सोडतीद्वारे विक्री केली जाणार आहे.

MHADA
Mumbai MHADA : मोठी बातमी! मुंबईत म्हाडाच्या ९५ इमारती अती धोकादायक, नोटीस धडकणार

म्हाडाच्या सोडतीद्वारे विक्रीकरता ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यासाठी https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर नोंदणी आणि अर्जप्रक्रियेचा शुभारंभ काल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे दिलेली ही सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ११४८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेत १६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेत ३९ सदनिका, भूखंडांचा समावेश आहे.

MHADA
MHADA Home: म्हाडाची ६२४८ घरं झाली स्वस्त, ठाण्यात घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा, वाचा A टू Z माहिती

नाशिक मंडळातील २० टक्के योजनेतील ६३ सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४ सदनिकांचा सोडत आहे. छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक सोडतीसाठी नवीन अॅप सुरु करण्यात आला आहे. Integrated Housing Lottery Management System (IHLMS 2.0) या प्रणालीवरुन तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

या फ्लॅटसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे तुम्ही त्याआधी अर्ज करावेत. तसेच १२ ऑगस्टपर्यंत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. यानंतर १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर २५ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम पात्र यादी जाहीर केली जाणार आहे. तुम्ही  IHLMS 2.0 या अॅपद्वारे तुम्ही अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

MHADA
MHADA Home: म्हाडाची ६२४८ घरं झाली स्वस्त, ठाण्यात घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा, वाचा A टू Z माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com