महाराष्ट्राच्या 'या' १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

राज्याचे नवनिर्वाचीत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan Saam TV
Published On

सूरज सावंत

मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यामुळे वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical college) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही (central government) निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन राज्याचे नवनिर्वाचीत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे.

Girish Mahajan
गोवंश प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४० प्राण्यांची सुटका, पाच अटकेत

महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, आता बैठकीत साहसी खेळाचा निर्णय घेतला. खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल.

Girish Mahajan
Rohit Sharma | भारत-पाकिस्तान सामन्यावर हिटमॅन रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला...

जिल्ह्या जिल्ह्यात मेडिकल काॅलेज उभारल्यास नक्कीच त्याचा फायदा सर्व सामान्यांना होईल. महाराष्ट्रात गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत, असंही महाजन म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com