गोवंश प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४० प्राण्यांची सुटका, पाच अटकेत

गोवंश जातीच्या प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
beed police arrested culprits
beed police arrested culpritssaam tv
Published On

बीड : गोवंश जातीच्या प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे. कत्तलीसाठी गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना बीड पोलीस अधीक्षकांच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडे (Five culprit arrested) असलेल्या ४० प्राण्यांची सुटका केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख विलास हजारे यांना प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीबाबत खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बीडच्या चुंबळी फाटा परिसरात सापळा रचून ही धडक कारवाई केली.

beed police arrested culprits
Aurangabad: सतर्क नागरिकांमुळं पाकीटमार कंगाल, लढवली नामी शक्कल

मिळालेल्या माहितीनुसार, बीड पोलीस अधीक्षकांच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४० गोवंश जातीच्या प्राण्यांची सुटका केली. पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख विलास हजारे यांना जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथक प्रमुख विलास हजारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह चुंबळी फाटा परिसरात सापळा लावला. यावेळी पोलिसांनी आरोपींकडे असलेली वाहने जप्त केली. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून ती वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com