Aurangabad: सतर्क नागरिकांमुळं पाकीटमार कंगाल, लढवली नामी शक्कल

एक पाकीट मारल्यानंतर मालामाल होणारे पाकीटमार आता कंगाल झाले आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv
Published On

औरंगाबाद - पाकीटमारांच्या भीतीमुळे बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक जण आपली पर्स, पाकीटे आहे सांभाळून ठेवतो. अनेकांना यापूर्वी लाखांचा- हजारोंचा फटकाही बसला. एक पाकीट मारल्यानंतर मालामाल होणारे पाकीटमार आता कंगाल झाले आहे.

बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजाराच्या ठिकाणी आणि जिथे गर्दी असते तिथे अनेकांची पाकीटे, खिसे आतापर्यंत गायब झालेली आहेत. कोणी बाजारात खरेदीसाठी तर कोणी पगार आणि व्यवसायाचे पैसे घेऊन घराकडे, गावाकडे किंवा बाजारात निघताना पाकीटमार ते कधी लंपास करीत असे कळत नव्हते. नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे मारून पसार झालेले चोरटे मालामाल होत होते पण आता त्याच मालामाल होणारे चोरटे सतर्क नागरिकांमुळे कंगाल झाले आहे.

हे देखील पाहा -

सध्या प्रत्येकजण डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करू लागला आहे. साधं दहा पाच रुपयांची खरेदी जरी केली तर फोन पे, गुगल पेचा वापर करतात. शिवाय मोबाइल वॉलेट, यूपीआय ट्रान्जेक्शन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या ४० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे खिशात पैसे कुणी फारशे ठेवताना दिसत नाही.

खिशात जास्तीचे पैसे व पाकीट ठेवणाऱ्यांची संख्या घटली आहे. याचा परिणाम शहरातील पाकीटमारीचे गुन्हे कमी झाले. मात्र, हेच पाकीटमार आता मोबाइल, मंगळसूत्र, दुचाकी चोरीकडे वळले असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे.

Aurangabad News
पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही

मागील दीड वर्षात औरंगाबाद शहर पोलीस हद्दीमध्ये १२ पेक्षा अधिक घटना घडलेल्या नाहीत. पूर्वी एक दोन पाकीट मारलं की आरामात पाच -पंचवीस हजार रुपये हाताला लागायचे. कधीकधी मोठी रक्कम ही मिळायची पण आता खिशातच पैसे नसताना खिसा कापून आणि पाकीट मारून पदरात काय पडणार म्हणूनच चोरटे आता बेरोजगार झालेत. त्यामुळे या चोरट्यांनी आता आपला मोर्चा मंगळसूत्र आणि दुचाकी चोरीकडे वळवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com