MBBSच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून संपवलं जीवन, धक्कादायक कारण आलं समोर

Wardha News: एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. वर्धाच्या सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली आहे.
MBBSच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून संपवलं जीवन, धक्कादायक कारण आलं समोर
Wardha NewsSaam Tv
Published On

चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यात एक एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. वर्धाच्या सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली आहे. पूजा रजानी, असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

पूजा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत होती. वैद्यकीय कारणाने कॉलेजमध्ये गैरहजर राहत असल्याने तिला परीक्षा देण्यापासून रोखण्यात आल्याने ती तणावात होती, अशी माहिती येथील विद्यार्थ्यांनी दिली. मागील एक वर्षांपासून ती आजारी असल्याने कॉलेजमध्ये गैरहजर राहत होती.

MBBSच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून संपवलं जीवन, धक्कादायक कारण आलं समोर
CCTV Footage: बहिणीचा हात धरून चालली होती चिमुकली, इतक्यात लोखंडी गेट अंगावर कोसळला, Shocking Video

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तिने आपल्या सहकारी मैत्रिणीला परीक्षेवरील बंदी हटावी म्हणून ती वरिष्ठाची भेट घेणार असल्याच सांगितलं, अशी माहिती तिच्या मैत्रणीने दिली. त्याच्या काही वेळेनंतर तिने कॉलेजच्या छतावरून उडी मारत जीवन संपवलं.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक व सावंगी पोलीस या यापाराकरणी अधिक तपास करत आहेत.

MBBSच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून संपवलं जीवन, धक्कादायक कारण आलं समोर
Cm Shinde On Thackeray: 'ते बिथरलेत', फडणवीस यांना चॅलेंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर

वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काय सांगितलं?

या घटनेवर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील काही दिवसांपासून तरुणी तणावात होती, त्यातून तिने आत्महत्या केली, असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थीना परीक्षेत न बसाविण्याबाबत महाविद्यालयाचा कोणताही वेगळा निर्णय नाही आहे. युजीसीने कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हा 75 टक्के थेरीत आणि 80 टक्के प्रॅक्टिकलमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे, हे युजीसीच्या नियमात आहे. आजच्या घटणेबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन तातडीने माजी कुलगुरु राजीव बोरले यांच्या नेतृत्वात उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे ही समिती या प्रकरणाचा तपास करणार आहे. रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्यूदय मेघे यांनी ही माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com