Navratri Festival: गरबा खेळायला मुलांना घेऊन जाताय तर सावधान.. लोणावळा, कुसगाव व तळेगावात समोर आले धक्कादायक प्रकार

Maval News : गरबा खेळायला मुलांना घेऊन जाताय; तर सावधान.. लोणावळा, कुसगाव व तळेगावात समोर आले धक्कादायक प्रकार
Navratri Festival
Navratri FestivalSaam tv
Published On

मावळ : सध्या देवीचा नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू असून गावोगावी तसेच शहरांमध्ये अनेक ठिकाणी (Navratri Festival) गरबा व रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व मुली मोठ्या संख्येने गरबा खेळायला रात्रीच्या वेळी जात आहेत. लहान मुले देखील यावेळी सोबत असतात. मात्र मागील दोन दिवसात (Lonavala) लोणावळ्याच्या कुसगाव व तळेगाव स्टेशन भागात मुले पळविण्याचा प्रयत्न झाला आहे.  (Live Marathi News)

Navratri Festival
Kalyan News : नदीत पोहण्यासाठी कल्याणहुन गाठली होती खडवली; हरवलेली तीन मुले कुटुंबियांच्या स्वाधीन

सद्या सर्वत्र नवरात्र उत्सव व सणांचे दिवस सुरू असल्याने महिला व नागरिक लहान मुलांना घेऊन उत्सवाच्या ठिकाणी जात असतात. गर्दीचा गैरफायदा घेत काही मंडळी मुले चोरण्याचे तसेच महिलांचे दागिने चोरणे, पाकीट मार, मोबाईल चोरीचे प्रकार घडत असतात. यात पहिली घटना लोणावळा शहराच्या जवळ (Maval) असलेल्या कुसगाव या गावात घडली. त्याठिकाणी बुधवारी रात्री नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी एका अनोळखी महिलेला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तिला समज देऊन सोडण्यात आले होते. तर गुरुवारी सायंकाळी पुन्हा त्याच महिलेला नांगरगाव दत्त मंदिर येथे महिला व नागरिकांनी पकडून लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची महिला मी मुले पळवून नेणार आहे असे म्हणत होती. तसेच काहीही बडबड करत होती. 

Navratri Festival
Manmad News: इंडियन ऑइल कंपनीत इंधन गळती; मराठवाडा, खानदेशात पंपावर जाणवणार तुटवडा

नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे टळले

सदरची महिला मनोरुग्ण असल्याचे लोणावळा शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. तिची ओळख पटवून तिच्या मुलाला बोलावून घेत तिला मुलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिसरी घटना तळेगाव स्टेशन येथे घडली. त्याठिकाणी दुपारच्या सुमारास एका अडीच वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन जात असताना एका इसमाला मुलाच्या वडिलांनी पकडले. तेव्हा हा मुल माझे आहे असे सांगून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला नागरिकांनी पकडून तळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com