Akola Market: अकोल्यातल्या भाजी बाजारात भीषण आग; 4 दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

Akola Vegetable Market Fire: अकोला शहरातील मुख्य भाजी बाजारात पहाटे भीषण आग लागली असून, चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे बाजार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
akola
akolasaam tv
Published On

अक्षय गवळी/ साम टीव्ही न्यूज

अकोल्यातल्या भाजी बाजारात भीषण आग लागली आहे. तब्बल चार दुकाने जळून खाक झाली आहेत. अकोला शहरातील मुख्य भाजी बाजार भागात आज पहाटे ही भीषण आग लागली. चार किराणा दुकाने आगीच्या आटोक्यात आली असणार जळून खाक झाली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं अनुमान लावले जाते. आग इतकी भयंकर होती की, अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल २ तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.

पहाटे ४ वाजता ही आग लागली होती. जेव्हा एका किराणा दुकानाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने तांडव केलाय अन् शेजारील तीन दुकानांनाही आगीने आटोक्यात घेतलं. दुकानातील मोठ्या प्रमाणात किराणा माल, तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आग झपाट्याने पसरली होती.

akola
E-Sakal: 'ई-सकाळ'चा डंका, देशात मराठीतील नंबर १ ठरलं न्यूज पोर्टल

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे आणखी गाड्या बोलवाव्या लागल्या. दुकाने बंद असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळा येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने शटर तोडण्यात आले आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

akola
Crime News: अहिल्यानगरमध्येही मस्साजोगसारखा प्रकार, गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून तरुणाची हत्या; मारहाण करताना बनवला व्हिडिओ

अग्निशमन अधिकारी मनीष कथले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्याचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी अग्निशमन विभाग आणि कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखोंचे नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तरीही आग लागल्याचे नेमकं कारण कळू शकले नाही.

akola
Pune GBS: पुण्यात जीबीएसचा उद्रेक ओसरला, गेल्या दोन दिवसांपासून एकही नवे रुग्ण नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com