भाजपात बंपर इनकमिंग! काँग्रेस अन् शिवसेनेला खिंडार; बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते भाजपवासी

Mass Political Shift: धाराशिव, रायगड आणि अमरावतीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे नेत्यांचा भाजपात मोठा पक्षप्रवेश. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ पार पडला.
Mass Political Shift
Mass Political ShiftSaam Tv News
Published On
Summary
  • धाराशिव, रायगड आणि अमरावतीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे नेत्यांचा भाजपात मोठा पक्षप्रवेश.

  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ पार पडला.

  • आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची संघटनात्मक ताकद वाढली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशातच धाराशिवसह राज्यातील विविध भागातून भाजपात बंपर एन्ट्री सुरू आहे. धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. उमरगा आणि लोहारा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी उमेदवार आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव तसेच जिल्हा काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी शेकडो समर्थकांसह मंगळवारी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजप पक्षाची ताकद वाढली आहे.

वसई - विरारमध्येही शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. वसई-विरार येथील ठाकरे गटातील माजी पदाधिकारी, बविआचे माजी जिल्हाप्रमुख, नगरसेवक आणि रायगड आणि अमरावती जिल्ह्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन भाजप प्रदेश कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत भाजपा ही सर्वसामान्यांची पार्टी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला आ. प्रकाश भारसाकळे, आ. स्नेहा पंडीत-दुबे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माजी मंत्री आणि लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची उपस्थिती होती.

Mass Political Shift
राजकारणात हालचालींना वेग! एकनाथ शिंदेंची दुसऱ्यांदा रात्री उशिरा दिल्लीवारी; नेमकं कारण काय?

धाराशिव जिल्ह्यातील 10 माजी जि.प. सदस्य, 11 माजी सभापती, 6 माजी नगराध्यक्ष, बाजार समितीचे 1 सभापती व 13 संचालक, 5 माजी उपनगराध्यक्ष, 5 माजी उपसभापती, जिल्हा बँकेचे 2 संचालक, तसेच 15 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला असल्याची माहिती आहे.

अमरावतीतील अंजनगाव सुर्जीचे माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे आणि त्यांचे सहकारी, तसेच दक्षिण रायगडमधील अनेक नेते आणि पदाधिकारी, उदा. बापूसाहेब सोनगिरे (द. रायगड), राष्ट्रवादीचे मुकुंद जांबरे (न्हावे), शिवसेना शहरप्रमुख प्रदीप गोरेगावकर (गोरेगाव), मनसेचे अमोल पवार व मंदार महामुंणकर, काँग्रेसचे अनिकेत महामुंणकर (भिरा गाव), शिवसेनेचे अनिल महाडिक (पन्हळघर) यांचा भाजपात प्रवेश झाला.

Mass Political Shift
मोठी बातमी! शिंदे गटातील नेत्याच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी ५ लाख रूपये घेताना रंगेहाथ पकडलं

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या वेळी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर आहे. त्याच प्रेरणेतून अनेक नेते भाजपात दाखल होत आहेत. पक्ष सर्व नव्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देईल आणि त्यांच्या भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्ष तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहिल."

या वेळी बसवराज पाटील म्हणाले, "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात भाजपाला 100% यश मिळवून देऊ."

उमरगा-लोहारा काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये:

माजी जि.प. अध्यक्ष राजेंद्र जगताप

माजी सभापती किसनराव कांबळे, बाबुराव राठोड

तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष राजोळे

युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार

महिला काँग्रेस अध्यक्षा संगीता कडगंचे

माजी पं.स. सभापती सचिन पाटील, उपसभापती दगडू मोरे

माजी जि.प. सदस्य डॉ. विक्रम जिवनगे

नगरपंचायत अध्यक्षा प्रेमलता टोपगे यांचा समावेश आहे.

वसई-नालासोपारा 'उबाठा' गटातून:

माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुख

माजी नगरसेवक व उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील

संतोष राणे, रवि राठोड, धनाजी पाटील

वसई शहर समन्वयक निलेश भानुशे, उपशहर प्रमुख प्रकाश देवळेकर आदींनी भाजपात प्रवेश केला.

अमरावती अंजनगाव सुर्जी येथून गौरव नेमाडे, निलेश आवंडकर, आकाश येऊल, उमेश दातीर यांचाही भाजपात प्रवेश झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com