Marathi News Live Updates : PM नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची उद्या महत्त्वाची बैठक, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

Marathi News Live Updates: आज 24 जुलै 2024 देश, विदेश तसेच महाराष्ट्रासह तुमच्या जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी आणि मुंबई पुण्यातील पावसाचे अपडेट एका क्लिकवर जाणून घ्या.
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची उद्या महत्त्वाची बैठक, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची महत्वाची बैठक उद्या आणि परवा दिल्लीत होणार आहे. देशातील विविध राज्याचे मुख्यमंत्री या बैठकिला उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ आज या बैठकिसाठी दिल्लीला रवाना होतील. २०४७ पर्यंत विकसित भारत हे बैठकीचं मुख्य उद्धिष्ठ असून त्यासाठी भारताची वाटचाल सध्या ५ ट्रिलियनच्या दिशेने सुरू आहे. उद्योग, इन्फ्रासह केंद्राशी संबधित महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य देत, यातील १ ट्रिलियन म्हणजेच २५ टक्के वाटा महाराष्ट्रातून देण्याचं मुख्य उदिष्ठ घेऊन मुख्यमंत्री या बैठकित सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Droupadi Murmu News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराषट्र दौरा स्थगित झाला आहे.

- पुणे, कोल्हापुर आणि लातुरचा दौरा स्थगित

- राज्यातील पाऊस आणि पुरपरीस्थितीमुळे दौरा स्थगित करण्याचा निर्णय

- राष्ट्रपती २८, २९ आणि ३० जुलै रोजी तीन दिवसांच्या पुणे, कोल्हापुर आणि लातूर दौऱ्यावर राष्ट्रपती येणार होत्या

 Kalyan News : कल्याण नगर मार्गावरील रायते पूल वाहतुकीसाठी खुला

कल्याण नगर मार्गावरील रायते पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्याने नदीचे पाणी रायते पुलावरून गेले होते , रायते पुलाला जोडणारे रस्ते उखडल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.

Salman khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, गँगस्टर रोहित गोदारा, अनमोल बिश्नोई विरोधात अजामीनपात्र वॉरंट

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी गँगस्टर रोहित गोदारा आणि अनमोल बिश्नोई विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टाने बजावलं अजामीनपात्र वॉरंट. १४ एप्रिलला रोजी सलमान खानच्या वांद्रे बँड स्टँड येथील घरावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी ९०० पानी चार्जशीट दाखल

पोर्श कार अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट साम टिव्हीला मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयात ९०० पानी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

Mumbai Crime News : शिवडी परिसरातून ४ कोटींचे अमली पदार्थ जप्त

शिवडी परिसरातून ४ कोटी रुपयांचं चरस जप्त करण्यात आलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाला ८ किलो चरस सापडलं आहे. तर माझगाव, मानखुर्द आणि दहिसर परिसरातून २६ लाख रुपयांचे एकूण १५० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Hingoli News : हिंगोलीत ठाकरे गटाने काँगेससह राष्ट्रवादीला डिवचले; उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. हिंगोली शहरातील विविध मार्गांवर लावण्यात आलेले हे पोस्टर्स आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत.

Narayan Rane : नारायण राणे यांचा स्वबळाचा नारा?

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी स्वबळाचा नारा?

भाजपने विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्या, अशी भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.

Shiv sena political Crisis : आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या; शिंदे गटाची हायकोर्टात याचिका

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केली आहे.

Sanjay Pandey News : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे उतरणार विधानसभेच्या मैदानात

मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. ते लवकरच राजकीय पक्ष संघटना काढण्याची तयारी करणार आहे. संजय पांडे हे उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्यास देखील इच्छुक होते.

Lavasa city road : लवासा सिटीकडे जाणारा मुख्य रस्ता टेमघर घाटात खचला, रस्ता वाहतुकीसाठी बंद

लवासा सीटीकडे जाणार मुख्य रस्ता टेमघर येथील घाटात खचला आहे. या परिसरामध्ये सलग चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडल्यामुळे या रस्ता खचला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या एका कडेच्या आतील भाग वाहून जाऊन, अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता खचला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

Nandurbar News : तब्बल ८ तासानंतर नवापूर तालुक्यातील रेल्वे वाहतूक सुरळीत

नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिचपाडा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे मार्गावर मातीचे ढिगारे आल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. तर दुसरीकडे कोडदा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे मार्गावर पाणी आल्याने गेल्या आठ तासांपासून सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प होती. रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करत रेल्वे मार्गावरील मातीचे मलबे हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे.

Hingoli News : हिंगोलीत भीषण अपघात, भरधाव पिकअप विजेच्या खांबाला धडकली

हिंगोली औंढा मार्गावर अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या नरसी फाट्यावर पिकअप वाहनाला भीषण अपघात घडला आहे. चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने भरधाव पिकअप विजेच्या खांबाला धडकली आहे. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Pune News : पुण्यात खडकवासला धरणातून होणारा विसर्ग बंद

पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये होणारा विसर्ग आज बंद होणार आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाने ही माहिती दिली आहे. आज शुक्रवारी सकाळी धरणातून १३००० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो कमी करून ४००० वर करण्यात येणार होता. आता मात्र पाठबंधरे विभागाने विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik News : नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 

नाशिकच्या मखमलाबाद परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

- बिबट्याच्या हल्ल्यात दिनकर काकड या शेतकऱ्याच वासरू ठार

- बिबट्याचा वासरावरील हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Navi Mumbai News : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. सोमवारपासून नियमित पाणी पुरवठा होणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यवृष्टीमुळे मनपा प्रशासनाने घेतला निर्णय आहे. मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण 2407 मिमी इतका पाऊस. मोरबे धरणामध्ये एकूण 74 % पाणी साठा उपलब्ध झाल्याने पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

Pune Rain News : पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार, प्रशासन अलर्ट मोडवर

पुण्याच्या घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं मुळशी तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. भोर तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्र असलेल्या धानवली गावातील 30 कुटुंबांचे प्रशासनाने तात्पुरतं स्थलांतर केलं. रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराच्या कड्याखाली असलेल्या धानवली गावावर कडा कोसळण्याची शक्यता असल्यानं गावातील 100 हून अधिक जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

IAS पूजा खेडकर प्रकरण : पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी सुरू

IAS पूजा खेडकरांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटं आहे का? यावर शिक्कामोर्तब करणारी कागदपत्रे समोर आली आहेत. त्यानंतर पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह खडबडून जागे झालेत. आयुक्तांनी वैद्यकीय विभागाच्या सगळ्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे. यात वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे, ऑर्थोपेडिक प्रमुख, फिजिओथेरपीच्या प्रमुखांसह ज्यांचा पूजा खेडकरांशी संबंध आला, त्या सर्वांची ते चौकशी करत आहेत.

thane politics : ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, राजन विचारेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात प्रवेश करणार

-ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे ..

-राजन विचारेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात करणार प्रवेश

-आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर प्रवेश होण्याची शक्यता.. यामुळे ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाला पडणार खिंडार आहे.

Rahul Gandhi News : मी निर्दोष, माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी सुलतानपूर कोर्टात आपला जवाब नोंदवला. मी निर्दोष आहे, माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 'माझ्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळतो. माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा डागाळण्यासाठी हे आरोप केले जात आहेत, असं मत राहुल गांधी यांनी कोर्टात मांडलं.

Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून हस्तक्षेप करण्यास नकार

काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीच. सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नागपूर जिल्हा न्यायालयाने 30 सप्टेंबरच्या आत त्यांच्या अपिलावर निकाल द्यावा, सुप्रीम कोर्टाने नागपूर जिल्हा न्यायालयाला निर्देश दिले आहे. सुनील केदार यांना निवडणूक लढवता येणार नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

MPSC Exam News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी )परीक्षा-२०२२च्या निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रारी. ⁠तक्रारी आल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अर्जदार आणि प्रतिसादकर्त्यांनी अपिलीय प्राधिकरणासमोर उपस्थित राहून दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. ⁠पडताळणीचे निर्णय ५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत संबंधित प्राधिकरण आणि MPSC ला कळवायचे आहेत. अपिलीय प्राधिकरणासमोर गैरहजर रहाणाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद मानले जाउन निवड प्रक्रियेतून वगळले जाणार आहे.

Washim News: वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तेलंगणा राज्याप्रमाणे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी करण्यात यावी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मंजुर केलेले प्रोत्साहान पर अनुदान देणे,वाशिम जिल्ह्याचा नदीजोड प्रकल्पात समावेष करणे,अतिवृष्टी व पीक विम्याच्या रक्कमा इ केवायसी न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात याव्या,२०२३ मध्ये अतिवृष्टी झालेल्या पिकांचा व फळबागचा सरसगट विमा तात्काळ देण्यात यावा. या मागण्यांना घेवून काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाशिम जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते घोषणाबाजी करत हे धरणे आंदोलन करण्यात आले.

Maharashtra Politics: ठाकरे गटात जोरदार इनकमिंग; मातोश्रीवर मोठे पक्षप्रवेश

ठाकरे गटामध्ये आज जोरदार इनकमिंग होत आहे. माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपासह विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सह मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.

Kalyan MNS Protest News: कल्याणमध्ये मनसेचे ताशा वाजवून आंदोलन

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग कार्यालयात मनसेने अनोखे आंदोलन आले. समस्यांबाबत महापालिका अधिकारी फोन उचलत नाही उत्तरे देत नाही, म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ताशा वाजवत आंदोलन केले. अधिकारी आत्ता तरी जागे होणार का? मनसे पदाधिकाऱ्यांचा संतप्त सवाल मनसैनिकांनी उपस्थित केला.

Aarey police station: आरे पोलीस ठाण्यातील बत्तीगुल; कामकाज ठप्प

मागील आठ दिवसांपासून आरे पोलीस ठाण्यातील बत्तीगुल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज ठप्प झाले असून तक्रारदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रपाळी कर्तव्यावर असणारे आरे पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी भीतीच्या सावटाखाली आहेत. आरे जंगलात बिबट्या आणि साप आणि इतर श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे मोबाईल टॉर्च लावून पोलीस कर्मचारी काम करत आहेत.

 Nashik News: पावसाने रस्त्यांची दुरावस्था, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास 

- पावसाच्या पाण्यामुळे इगतपुरी तालुक्यातील वैतरणा गावात नागरिकांचा जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील वैतरणा गावात रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्ता ओलांडत असताना अपघात होण्याचा धोका आहे. प्रशासनाकडे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Kanwar Yatra Supreme Court: कावड यात्रा प्रकरण: सुप्रीम कोर्टातील सुनावणी २ आठवड्यांनी पुढे ढकलली

कावड यात्रा प्रकरणी सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली. सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश पुढील सुनावणीपर्यंत कायम राहणार आहे. थोडक्यात 2 आठवडे हॉटेल आणि ढाब्यावर नाव लिहावी लागणार नाहीत. कोर्टाने उत्तर देण्यासाठी संबंधित राज्य सरकारांना एका आठवड्याची मुदत दिली असून सरकारच्या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांना आठवडाभरात प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे.

Maharashtra Police News: १५० अद्यावत सॉफ्टवेअर आणि १०० तज्ञांनी सज्ज महाराष्ट्र सायबर

महाराष्ट्र विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची पत्रकार परिषद पार पडत आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सायबर विभाग अद्ययावत होणार असल्याचे सांगितले. ४० कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक महाराष्ट्र सायबरने रोखली. आत्तापर्यंत ३२ कोटी रुपये महाराष्ट्र सायबरने फ्रीझ केले. ४० कोटी रुपयांची बँकेतील सायबर दरोडा महाराष्ट्र सायबरने रोखला. पूर्ण टीम ला २५,००० रुपयांच बक्षीस जाहीर.

Mumbai News: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरण, आरोपींची हायकोर्टात याचिका 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Mumbai News: मिठी नदीची मनसेकडून पाहणी, पालिकेच्या नालेसफाईची केली पोलखोल

मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. मनसेकडून आज मिठी नदीची पाहणी करण्यात आली. पालिकेच्या नालेसफाईच्या शंभर टक्के दावा फक्त कागदावरच असल्याची मनसेकडून पोलखोल केली आहे. फिल्टर पाडा परिसरात आजही नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ आणि झाडेझुडपे असल्याची मनसेची तक्रार आहे.

Nagpur News:  नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुखांविरोधात घोषणाबाजी

नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघात नरखेड तालुक्यातील मोवाड येथे अनिल देशमुखांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे.

Delhi News:  राज्यपालांकडून विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला मंजुरी न देण्याचं प्रकरण अपडेट 

राज्यपालांकडून विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला मंजुरी न देण्याचं प्रकरण. केरळ आणि पश्चिम बंगाल सरकारने राज्यपालांसमोर विधानसभेने मंजूर केलेल्या अनेक विधेयकांना मंजुरी दिली नसल्याचा दोन्ही राज्यांचा आरोप आहे. अनेक विधेयके राज्यपालांकडून मंजूर होण्याऐवजी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन्ही राज्यांचे राज्यपाल सचिवालय यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.

Nagpur News: पूर्व विदर्भातील भाजपच्या कोअर कमिटी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरूवात

पूर्व विदर्भातील भाजपच्या कोअर कमिटी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला रवी भवनमध्ये सुरूवात झाली. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीला नागपूर ग्रामीणची बैठक होत आहे.

Nashik News:  नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची ताकद वाढणार, विधानसभा निहाय आढावा बैठका सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू झाली आङे. उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर नाशिकमध्ये घेतायत विधानसभा निहाय आढावा बैठक. जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे गटाकडून आढावा घेतला जात आहे.

Pune News:  पुण्यात कायमस्वरुपी उपाय योजना केल्या जातील - मुरलीधर मोहोळ

पुण्यात कायमस्वरुपी उपाय योजना केल्या जातील. मदत सगळी दिली जाईल. तातडीने सर्वे सुरू केला आहे. महापालिका यंत्रणा काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

खडकवासला धरणातून पाणी एवढं का सोडलं याचा,महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात ताळमेळ का नव्हता याची चौकशी केली जाईल.बाकीचे मुद्दे आहेत सगळे ते पाहू. परत अशी परस्थिती उद्भभणार नाही याची काळजी घेतली जाईल

IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांना दिल्ली पोलीस बजावणार नोटीस

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली पोलीस नोटीस बजावणार आहेत. ⁠यूपीएससीने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस बजावली जाणार आहे.

Pune News: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सिंहगड रोड परिसरातील एकता नगर सोसायटीत पाहणी करण्यासाठी पोहोचले. पुण्यामध्ये पूरानंतर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Kolhapur Rain: पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय. पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ४४ फूट इतकी आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहतेय.

Sharad Pawar:  राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा

राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा निघणार आहे. ॲागस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिव स्वराज्य यात्रेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics: भाजप नेते रमेश कुथेंची ठाकरे गटात घरवापसी; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करून घर वापसी करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाचे पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. २०१८ साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच 1995 आणि 1999 या दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणुकीआधी जिंकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजपनेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार का ह्या चर्चा होत्या... मात्र त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घर वापसीचा निर्णय घेतला आहे.

Worli Crime: वरळीमध्ये आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

वरळीमधील आरटीआय कार्यकर्ता आणि पोलिसांच्या खबऱ्याची हत्या करण्यात आली आहे. गुरुसिधप्पा वाघमारे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघा स्पा मालकांसह एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. गुरुसिधप्पा मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील स्पा मालकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याने त्याची हत्या झाल्याचा आहे पोलिसांचा दावा आहे.

Akola Accident: ट्रक- कारचा भीषण अपघात; २ ठार

अकोल्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा अमरावतीत अपघात! नागपूरहून कारने अकोल्याकडे येत असताना अपघात झाला. रॉन्ग साईंडनं कार टाकल्यानं ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर धड़क होऊन भीषण अपघात. अपघात कारमधील दोघांचा मृत्यु. नकुल तडोकार आणि विजय मदनकार यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू.

Nandurbar Train: पावसाचा फटका! नंदुरबारमध्ये रेल्वे वाहतूक ठप्प

अतिवृष्टीमुळे सुरत - भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावीत झाली आहे. कोळदा -चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. अनेक रेल्वे गाड्या विविध स्टेशनवर थांबून आहेत. लांब पल्याच्या गाड्या असल्याने स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रवाश्यांच्या चहापाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे.

Sharad Pawar: शरद पवार दोन दिवस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज आणि उद्या दोन दिवसीय छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जिल्ह्यातील मतदार संघाची चाचणी शरद पवार हे करणार आहेत. तसेच शरद पवार यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

Sonam Gedam Gadchiroli: गडचिरोलीची सोनाली ठरली पहिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. गडचिरोलीच्या धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून तिची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तिला प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर नागपूर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे

Kanwar Yatra Hearing: सुप्रीम कोर्टात आज कावड यात्रा प्रकरणी सुनावणी

सुप्रीम कोर्टात आज कावड यात्रा प्रकरणी सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेदरम्यान असणाऱ्या दुकानांना नेमप्लेट लावण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या या आदेशाला सुप्रीम कोर्टाने २२ जुलैला स्थगिती दिली होती.

तसंच मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारला या प्रकरणात नोटीस बजावली होती. कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. दुकानदारांना नाव लिहिण्याची सक्ती नाही अस कोर्ट अंतरिम स्थगिती देताना म्हणाले होते. कावडयात्रींना त्यांची पसंतीनुसार शाकाहारी अन्न मिळणं गरजेचे आहे पण त्यासाठी सरकार फूड सेफ्टी ऍक्ट, स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट अंतर्गत आदेश जारी करू शकतात अशीही टिपण्णी कोर्टाने केली होती.

Pandharpur News: विठ्ठल रुक्मिणीची आज प्रक्षाळ पूजा, आजपासून 24 तास पदस्पर्श दर्शन बंद

विठ्ठल रुक्मिणीची आज प्रक्षाळ पूजा करण्यात येत आहे. आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास पदस्पर्श दर्शन बंद झाले आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने 7 जुलैपासून 24 तास पदस्पर्श दर्शन सुरू होते.

Pune News: खडकवासला धरणातून आता 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा कमीकरण्यात आलाय. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 31 हजार क्युसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आलाय.

Bhandara News:  भंडाऱ्यात स्लॅब आणि घराची भिंत अंगावर पडून मजुराचा जागीच मृत्यू

जीर्ण झालेले घराची स्लॅब व्हायब्रेटर मशीन तोडत असताना स्लॅब आणि घराची भिंत अंगावर पडून मजुराचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे घडली. प्रफुल प्यारेलाल रामटेके असं घटनेतील मृतक युवकाचं नाव आहे.

Nandurbar News: नवापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, शाळांना सुट्टी जाहीर

नवापूर तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. नवापूर शहरातील शाळांना प्रभारी तहसीलदारांनी सुट्टी जाहीर केलीय. ग्रामीण भागातील अनेक नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रस्ते बंद झाले आहेत.

Ahmednagar News: भंडारदरा परिसरात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

अकोले तालुक्यातील घाटघर , पांजरे , रतनवाडी परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे हा भाग गारठून गेलाय. जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंगर दऱ्यांतील आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल होत असुन पिके पाण्याखाली गेली आहेत.

Jalgaon News: तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

मध्यप्रदेश आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तापी नदीमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढलीय. तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय.

Mumbai News:  मुंबईत रात्रीपासुन पावसाची विश्रांती, मुंबईकरांना दिलासा

मुंबईत रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाऊस जरी नसला तरी रेल्वे वाहतुक उशिराने आहे. मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या ५ मिनटं उशिराने धावत आहे. हार्बर लाईनवर कोणताही परिणाम नाही; हार्बर लाईन मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

 Pune Rain:  पुण्यात मुसळधार पावसाने घरांमध्ये पाणी साचलं 

पुण्यातील खिलारेवाडी परिसरामध्ये अजूनही घरांमध्ये पाणी पाहायला मिळत आहे. खडकवासल्याच्या पाण्यातून अनेक साप, विच्छू, पाण्यात वाहून आल्याने ते घरामध्ये दिसत आहेत त्यामुळे भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये पाहायला मिळतंय.

Jalgaon Accident: भुसावळमध्ये दुचाकीचा भीषण अपघात, महिला जखमी

भुसावळ शहरातील खडका चौफुली परिसरात रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. भरचौकात मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच खड्ड्यातून मार्ग काढताना अंदाज न आल्याने दुचाकीवरील महिला दुचाकीसह थेट नाल्यात पडली. या अपघातात महिला जखमी झाली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. खड्ड्यांमुळे सातत्याने या ठिकाणी अपघात होत असल्याने वाहनधारकांनी पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com