Marathi News Live Updates: हिंगोलीच्या आसोला गावात गोळीबार, एक जण गंभीर जखमी

Maharashtra Political Breaking News 18th July 2024: राज्यामध्ये सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसासह मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या...
Live Marathi News By Saam TV
Saam Tv Breaking News Live Updates In Marathi MaharashtraSAAM TV
Published On

Hingoli Firing : हिंगोलीच्या आसोला गावात गोळीबार,एक जण गंभीर जखमी

हिंगोलीच्या हट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील आसोला गावात शुल्लक कारणावरून दोन जणांमध्ये राडा झाला आहे. या राड्यादरम्यान एका तरुणाकडून दुसऱ्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिसांसह हिंगोली पोलिसांचे विशेष पथक आसोला गावाच्या दिशेने निघाले असून नेमका कोणत्या कारणाने गोळीबार झाला याची माहिती पोलीस घेत आहेत.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी धनजंय मुंडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी, राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांची, तर प्रदेश प्रवक्तेपदी, विधानपरिषदचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डीब्रुगड चंदीगड एक्स्प्रेसचा भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू, २५ जखमी

डीब्रुगड चंदीगड एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. डीब्रुगड चंदीगडचा एक्स्प्रेसचा घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तपासादरम्यान मोठी माहिती मिळाली. अपघात होण्यापूर्वी लोको पायलटने स्फोटाचा आवाज ऐकला. आतापर्यंत घटनेत दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले.

janhvi kapoor Health : अभिनेत्री जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल

अभिनेत्री जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाल्याचं तिच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं आहे.

IAS Pooja Khedkar Case : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र पूर्ण कागदपत्रे असल्याने अर्ज स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे दिलीप खेडकर पुन्हा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण पोलीस दिलीप खेडकर यांच्या शोधात आहे.

Prasad Lad On Manoj Jarange : हिंमत असेल तर त्यांनी आरक्षणावर माझ्याशी चर्चा करावी, प्रसाद लाड यांचं जरांगेंना खुलं आव्हान

जरांगे पाटील हे माझे बंधू आहेत त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली तरी मी टीका करणार नाही, कारण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आहेत. हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं पण केंद्रात पवार व उद्धव ठाकरे ते टिकवू शकले नाहीत. त्यांना जाब विचारायची हिंमत जरांगेंममध्ये नसल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

Shiv Sena Eknath Shinde :  विधानसभेत १२६ जागा लढण्याची एकनाथ शिंदेंची तयारी

विधानसभा निवडणुकीत १२६ जागा लढवण्याची एकनाथ शिंदे यांची तायरी असून ११० निरीक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तीन जागेसाठी एक प्रभारी नेमण्यात येणार आहे. विद्यमान आमदारांना जागा वाटपात पहिलं प्राधान्य असणार आहे.

Vidhan Sabha Election : विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी,  सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पार्श्वभूमीवर राज्यात शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार आहे. राज्यातील सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीसाठी आमदार श्वामन राव चटप ,राजू शेट्टी ,शंकर अण्णा धोंडगे , अनिल धनवट, ललित बहाळ उपस्थित होते.

NEET Paper Leak : मोठी बातमी! NEET पेपर लीक प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा NTA ला महत्त्वपूर्ण आदेश

NEET पेपर लीकप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने NTA ला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शनिवारी दुपारी १२ पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. शहरे आणि केंद्रानुसार आकडेवारी जाहीर करावी पण हे करताना विद्यार्थ्यांची ओळख लपवावी, असंही न्यायालयाने नमूद केलं असून पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात 22 जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव दोघेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत निवडणुकीच्या तयारीसाठीच्या रोड मॅपसह जागावाटप आणि मित्रपक्षांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Bhandara News: भंडाऱ्यात नळाच्या पाण्याची पाईप लाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

भंडारा शहरासाठी नव्याने सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेल्या नाही. मात्र काही भागांमध्ये नळ योजना सुरू करण्यात आली. मात्र काहीच दिवसांमध्ये हा काम किती निकृष्ट आहे हे पुढे आलेला आहे. भंडारा शहरातील खात रोडवर यशोदा नगर येथे पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या मोठ्या पाईपलाईन मध्ये अचानक जॉईन्ट सुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेला. पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता ज्यामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेलेला आहे. त्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी ती पाईप लाईन बंद केली मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेलेला आहे

Sindhudurg News: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर विरोधकांचे घंटानाद आंदोलन

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर विरोधकांनी एकवटत घंटानाद आंदोलन केले आहे. पंधरा वर्षे आमदार आणि आठ वर्ष मंत्री असणारे दीपक केसरकर विकासाच्या घोषणा करण्यापलीकडे काही करत नाहीत असा आरोप करत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घंटानाद आंदोलन छेडल. या आंदोलनात ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी झाली होती. सात वर्षांपूर्वी सावंतवाडी बस स्थानकाचे भूमिपूजन झाले मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही. बस स्थानकावर चिखल, खड्डे, छताला लागलेली गळती यामुळे प्रवाशांचे होणारे हाल. अशी परिस्थिती बस स्थानकावर असल्याचा आरोप करत घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या.

Solapur News: सोलापूरात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

सोलापुरात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कार्यक्रमाच्या बॅनर वरती फोटो नसल्याने जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांनी नाराजी व्यक्त केली. उघड नाराजी दाखवत असताना उपाध्यक्ष महेश माने आणि जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषद संपताच गोंधळ झाला.

Mira Bhayandar Accident: 

भाईंदर पूर्वेच्या बस स्पॉटवर मीरा भाईंदर परिवहनच्या बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्गादेवी बिस्ट असे या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून बसची तोडफोड. महिलाचा मृतदेह भाईंदर पच्छिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

IAS Pooja Khedkar News: मनोरमा खेडकर यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - मनोरमा खेडकर यांना कोठडी दरम्यान औषधे देण्याची कोर्टाची परवानगी. ⁠मात्र, त्यावतिरीक्त विशेष काही सवलत मिळणार नाही.

Ahmednagar News: 

पूजा खेडकर प्रकारणी दररोज एक एक खुलासे होतं असून खेडकर यांनी दिव्यांग आणि अपंगत्वाचे घेतलेल्या प्रमाणपत्रा संदर्भात खेडकरसह त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत दृष्टीहीन (अंध ) संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदेर्शने करण्यात आली. आम्ही दृष्टीहिन असतांना देखील विविध दाखले मिळविण्यासाठी आमची हेळसांड होते मात्र यांना प्रमाणपत्र प्राप्त होते त्यामुळे करण्यात आलेल्या मागणीनुसार 1 ऑगस्ट पर्यत कारवाई न केल्यास 9 ऑगस्ट क्रांतीदिनी साखळी उपोषण करण्याचा इशारा दृष्टीहीन संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे...

Amravati News: नदीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू, अमरावतीमधील घटना

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील पिंपरी थुगाव येथील शिवराम सावरकर हे सकाळी शेतात जात असताना नदीवरून पाय घसरून पडून खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. एनडीआरएफच्या पथकाने शोध घेऊन नदीतून मृतदेह शोधून काढला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 UP Train Accident: चंदिगढ डीब्रूगड एक्स्प्रेसचे डबे घसरले; कोणीही जखमी नसल्याची माहिती 

चंदिगढ डीब्रूगड एक्स्प्रेस ट्रेनचा अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामधे ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. चंदिगढवरून गोरखपुरला ही जात होती. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Ghatkopar Fire News: घाटकोपरमध्ये इमारतीला आग; साहित्य जळून खाक

घाटकोपर च्या गौरीशंकर वाडी विभागात असलेल्या गीतांजली इमारती मध्ये ११ मजल्यावर आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर पुरोहित कुटुंब राहते. दुपारी १ वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरातील फ्रिजला प्रथम आग लागली आणि ही आग घरात पसरली. आग लागल्याचे कळताच पुरोहित कुटुंब घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. यात कोणी जखमी झाले नसले तरी घरातील साहित्य जळून खाक झाले.

Jalna News: तलावात बुडून तरुणाचा मृत्यू; जालन्यातील घटना

जालन्यातील पिरकल्याण गावामध्ये एका तलावात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला,आज दुपारी माशे धरण्यासाठी हा तरुण तलावात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय, ज्ञानेश्वर बावणे वय वर्ष 33 , असे तरुणाचे नाव असुन याची माहिती गावातील तरुणांना कळाली असता, ग्रामस्थानी हा मृतदेह बाहेर काढला, दरम्यान पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे.

Nashik News: नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर शरद पवार गटाचे आंदोलन; टोलनाका बंद पाडला 

राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाका बंद पाडला आहे. नाशिक मुंबई महामार्गाची झालेल्या दुरावस्थेविरोधात विरोधात शरद पवार गटाने आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरील वाहने टोल न भरता सोडली.

Nashik News: नाशिकमध्ये डेंग्युचा कहर; ठाकरे गट आक्रमक

नाशिक शहरातील डेंग्यूचा वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डेंग्यू नियंत्रणासाठी ठेकेदाराकडून औषध फवारणी होत नसल्यानं डेंग्यूचा फैलाव होत असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर डेंग्यूचा प्रसार वाढत असतांनाही पालिका आयुक्तांची मात्र थातुर मातुर उत्तरे दिली.

Beed News : बीडच्या माजलगावमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरली शाळा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वाघोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नियुक्त करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वारंवार अर्ज विनंती करूनही शिक्षकाची नियुक्ती होत नसल्याने ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठलं. या ठिकाणीच विद्यार्थ्यांना बसवून शाळा भरवली.

Buldhana News: कामगार कार्यालयाच्या योजनेपासून खरे लाभार्थी वंचित; बुलढाण्यात काँग्रेसचा मोर्चा

बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सरकारी कामगार कार्यालया मार्फत बांधकाम मजुरासाठी विविध योजना राबविल्या जात आहे, त्या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसून इतरांना दिला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. तसेच आता कामगार किट व संसार भांडी योजने अंतर्गत दिल्या जात आहेत ते भांडी व कामगार किट पेटी सर्व सत्ताधारी आमदार यांच्या कार्यलयामार्फत दिल्या असल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला असून त्या विरोधात काँग्रेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

Manorama Khedkar News: मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केले जाणार 

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. पौड पोलीस अडीच वाजता मनोरमा खेडकरला कोर्टात हजर करणार आहेत. आज सकाळी पौड पोलीसांनी महाड येथून मनोरमा खेडकरला अटक केली होती.

वैद्यकीय तपासणी नंतर पोलिस मनोरमा खेडकरला करणार कोर्टात हजर

Gadchiroli News: गडचिरोलीत ठार झालेल्या 12 नक्षलवाद्यांवर होते 86 लाखांचे बक्षीस

गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांडोली जंगलात बुधवारी झालेल्या चकमकीत नक्षल कॅडरचे मोठे नेते ठार झाले आहेत. त्यांची ओळख आता पटली आहे. यामध्ये 07 पुरुष आणि 05 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांवर तब्बल 300 हुन अधिक गुन्हे असल्याने 86 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 च्या 7 तुकड्यांचे जवळपास 200 जवानांनी हे अभियान राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

Baramati News: बारामतीत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती; शरद पवार उपस्थित राहणार

बारामतीत आज शारदा प्रांगणावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती साजरी केली जाणार आहे.आज सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, सचिन आहिर, जयदेव गायकवाड, उत्तम जानकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत…

Nanded News: नांदेडमध्ये  महसूल कर्मचाऱ्यांचा संप

विविध मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. मागील चार दिवसांपासून हा संप सुरू आहे. परंतु शासनाने आद्यप या महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यां मान्य केल्या नाहीत. त्यामुळे महसूल कर्मचारी आक्रमक होत शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा भरतील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Jammu And Kashmir: सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपावड्याच्या केरणमधे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. LOC जवळ झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच आणखी काही दहशतवादी लपलल्याची शक्यता वर्तवली असून सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Harshawardhan Patil: 'इचलकरंजी पाकव्याप्त कश्मीर असं वक्तव्य मी केलेलं नाही', हर्षवर्धन पाटलांचे स्पष्टीकरण

इचलकरंजी पाकव्याप्त कश्मीर असं वक्तव्य मी केलेलं नाही त्या निवडणुकीत निवडून आलेले खासदार धैर्यशील माने यांनी जे भाषण केलं त्या भाषणाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. हातकलंगले मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली अनेक जण धैर्यशील मानेंना पाडण्यासाठी सज्ज होते तशाही परिस्थितीत टेन्शनच्या परिस्थितीत धैर्यशील माने निवडून आले त्याबद्दल मी ते भाष्य केलं आहे त्याचा कुठल्याही प्रकारे विपर्यास करू नये असा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

Nashik News: काश्मिरमधील भ्याड हल्ल्याचा निषेध; ठाकरे गटाचे आंदोलन

काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज आंदोलन करण्यात आले, नाशिकच्या शालिमार येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गट आक्रमक झाला होता केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी यावेळी करण्यात आली या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Pune Satara Highway Accident: पुणे- सातारा महामार्गावर बसचा अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावच्या हद्दीत दुभाजकाला धडकल्यानं खाजगी बसचा अपघात झाला. पुण्याहून प्रवासी घेऊन महाबळेश्वरला जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला बसमधले प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Andheri Subway Closed: अंधेरी सबवे बंद; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सभे परिसरात देखील अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे

Mumbai News: आझाद मैदानावर फेरीवाल्यांचे धरणे आंदोलन

आझाद मैदानात मुंबईतील फेरीवाल्यांनी धरण आंदोलन केले. मुंबईतील अनेक फेरीवाल्यांच्या संघटनांनी या आंदोलनात भाग घेतला असून फेरीवाला कायदा २०१४ ची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी आणि नगर पाथविक्रेता समितीची स्थापना करून फेरीवाल्यांचे न्याय नियम करण्यात यावे या फेरीवाल्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

Mumbai Rain News: गोरेवावमधील सोसायटीत आढळला १० फूटाचा अजगर; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबई सह उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशातच मुंबईच्या गोरेगाव येथील नागरी निवारा परिसरात नाल्यातील एक अजगर हा सोसायटीच्या आवारामध्ये शिरला आहे. साधारणपणे आठ ते दहा फूट लांबीचा हा अजगर सोसायटीत शिरल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Manorama Khedkar : मनोरमा खेडकर यांची वैद्यकीय चाचणी झाली, पोलीस ठाण्यात आणलं

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक

अटकेनंतर वैद्यकीय चाचणी पूर्ण, पौड येथील पोलीस ठाण्यात पुन्हा आणलं

⁠पुढील कायदेशीर प्रकिया पूर्ण करुन न्यायालयात हजर करणार

⁠पौड येथील न्यायालयात हजर करणार

IAS Pooja Khedkar : पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करणाऱ्या पूजा आणि दिलीप खेडकरांवर कारवाईची मागणी

पुणे :

वादग्रस्त आयएसए अधिकारी पूजा खेडकर प्रकरण

पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी

पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप केला होता

सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज विभागीय आयुक्तांना निवेदन दिले

Shivsena Politics : शिवसेनेत मोठ्या घडामोडी; मंत्री, नेते, आमदार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले

शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते मुंबईत वर्षा बंगल्यावर दाखल

लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातील घडामोडींचा घेणार अंदाज

पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियानाबाबत घेणार माहिती

लोकसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला या संदर्भात देखील घेणारा आढावा

पक्षांतर्गत वाद आणि नाराजी तसेच स्थानिक राजकारणाबाबत घेणार माहिती

NCP Protest : कंत्राटी भरतीविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

कंत्राटी भरतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन

राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन

...तर NEET पुनर्परीक्षेचे आदेश देऊ : सरन्यायाधीश

NEET प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे

सिस्टमॅटिक पेपरफुटी झाली हे जर तुम्ही आम्हाला पटवून दिले तर आम्ही पुनर्परीक्षेचे आदेश देऊ

सरन्यायाधीशांनी याचिकर्त्यांना सांगितले

NEET बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

आजच NEET प्रकरणाची सुनावणी होणार

आपण उद्याही हे प्रकरण ऐकू शकतो अस सरकारची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्त्यांनी सांगितलं

लाखो मुले NEET बाबतच्या निर्णयाची वाट पाहत आहेत - सरन्यायाधीश

आम्ही आजच सुनावणीला सुरुवात करत आहोत- सरन्यायाधीश

Pandharpur Wari : चंद्रभागेतून ३ टन कचरा काढला बाहेर, सामाजिक संस्थांचे ४०० प्रतिनिधी कार्यरत

आषाढी वारीत सामाजिक संस्थांकडून चंद्रभागा स्वच्छता मोहीम सुरू

४०० कर्मचाऱ्यांनी ३ टन कचरा काढला चंद्रभागेच्या बाहेर

आषाढी वारीदरम्यान सामाजिक संस्था व बीव्हीजीच्या माध्यमातून चंद्रभागेची स्वच्छता

चंद्रभागेच्या परिसरात ४०० कर्मचारी कार्यरत, जवळपास तीन टन कचरा काढला बाहेर

बीव्हीजीच्या वतीने आणखी दोन दिवस चंद्रभागा स्वच्छता अभियान राबवणार

Pandharpur : अजय बारस्कर महाराजांची कार जाळली, पंढरपुरातील घटना

अजय बारस्कर महाराज आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले होते.

65 एकर परिसरात आलीशान कार पार्क केली होती. ती कार अज्ञातांनी पेटवली.

परवा मध्यरात्री ते काल दुपारच्या दरम्यान कार जाळल्याचा प्राथमिक अंदाज

या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Ajit Pawar : अजित पवार विशाळगडला जाणार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज सायंकाळी विशाळगडला जाणार

विशाळगड प्रकरणानंतर अजित पवार देणार भेट

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांची ACB कडून चौकशी

एसीबीकडून दिलीप खेडकर यांची खुली चौकशी सुरू

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर

बेहिशेबी मालमत्ता संदर्भात चौकशी सुरू

अहमदनगर एसीबी करत आहे चौकशी

२०१५ पासून दिलीप खेडकर यांची नगर एसीबीकडे चौकशी सुरू आहे.

आता परत पूजा खेडकर प्रकरणानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.

Karad Water Shortage : कराड शहरात 'पाणीबाणी'

कराड शहरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा योजना बंद

जॅकवेलचा पाइप फुटल्यानं मोठी अडचण

दुरुस्ती करण्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांना अपयश

कृष्णा उद्योग समूहाच्या मदतीने जुनी पाणी योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न

गेल्या तीन दिवसांपासून कृष्णा उद्योग समूहाच्या टँकरने शहराला पाणीपुरवठा

Ratnagiri Rain : लांजा तालुक्यातील अंजणारी येथील दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली

काजळी नदीला पूर आल्यानं दत्त मंदिर परिसरात पाणी घुसलं

रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस

दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी

Naxal Attack in Chhattisgarh:  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद, ४ जखमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षादलांवर आज मोठा हल्ला केला.

यात २ जवान शहीद झाले. तर ४ जवान गंभीर जखमी आहेत.

विजापूर जिल्ह्यात तर्रीम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात जवान मोहिमेवर निघाले होते.

नक्षलवाद्यांनी घडवून आणला आयईडी स्फोटात ६ जवान गंभीर जखमी झाले होते.

त्यातील दोन जवान शहीद झाले.

चार जवान गंभीर जखमी

पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने नेण्यात आले.

Mumbai News: विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहेत. शरद पवार यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत सरकारला चिमटा काढला होता.

Jalgaon News: सातपुडा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस, हरिपुरा प्रकल्प ओवर फ्लो

जळगावच्या यावल तालुक्यातील हरिपुरा प्रकल्प ओवर फ्लो झाला आहे. सातपुडा पर्वतरांगा सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हरीपुरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. पर्यटकांनी धरण क्षेत्रात प्रवेश न करण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Sambhajinagar: ५० हजारांची लाच घेताना महिला सरपंच आणि तिच्या पतीला अटक 

१५ व्या वित्त आयोगातील मंजूर ३ लाख रुपयांचा निधी गावात देण्यासाठी महिला सरपंच आणि तिच्या पतीने ५० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टाकळीमाळी गावात करण्यात आली. ज्योती आनंद गवळी असे सरपंच महिलेचे नाव आहे. तर आनंद रमेश गवळी पतीचे नाव आहे.

Nashik News: नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळत आहे. कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपात मिळणारं अनुदान सरकाने बंद केलं. रोहयो अंतर्गत कांदा चाळीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात अनुदान दिलं जात होतं.

Raigad News: IAS पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांना अटक

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. रायगडमधून मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Amravati News: अमरावती जिल्ह्यात 17 दिवसांत आढळले 27 डेंग्यूचे रुग्ण

अमरावती जिल्ह्यात 17 दिवसांत 27 डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात पावसाळ्याचा जोर वाढल्यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे.

Thane Rain: ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे रेल्वेसेवेवर परिणाम

ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. ठाण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिरा धावत आहेत. पावसाचा जोर अधिक वाढल्यास रेल्वेचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain:  मुंबईत पुढील ३-४ तास पावसाची संततधार कायम राहणार, हवामान खात्याची माहिती

मुंबईत पुढील ३-४ तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळी ५.३० वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी पावसाची नोंद झाली. तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ६ वाजता मोदी अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि ऑफिस पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. लोकसभेतील तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन केल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुख्यालयात बैठक घेत आहेत.

Haryana News: अग्निवीर जवानांना नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण मिळणार, हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

अग्निविर जवानांसाठी हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अग्निवीर जवानांना राज्यातील नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. पोलिस, वनरक्षक, कारागृह व्यवस्थापन, खान रक्षक यासह काही ठिकाणी अग्निविरांना नोकरीत आरक्षण मिळणार आहे. सोबतच, एखादा अग्निवीर व्यवसाय करू इच्छित असेल तर त्याला सरकारतर्फे ५ लाख रुपयांच बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी ही घोषणा केली.

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. बायडेन यांची स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. कोरोना झाला असला तरी माझी तब्येत ठणठणीत असल्याचे बायडेन यांनी सांगितले. लोकांसाठी माझं काम सुरू राहील, असं देखील ते म्हणाले.

Pune News: डीझेलवरील धावणारी लालपरी आता सीएनजीवर धावणार, एसटी महामंडळाचा निर्णय

डीझेलच्या वाढत्या किमती, प्रदूषण यामुळे डीझेलवरील धावणारी लालपरी आता सीएनजीवर धावणार असल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर, राजगुरूनगर, बारामती आणि सासवड या चार आगारांतील एकूण १३२ लालपरी बसना सीएनजीत रुपांतरित करण्यात आले. त्यासाठी बारामती, शिरुर, सासवड आणि मंचर या चार आगारांत स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम सुरू आहे.

Pune News: झेडपी नोकरभरतीसाठी विविध ५ संवर्गासाठी आजपासून परीक्षा

झेडपी नोकरभरतीसाठी विविध ५ संवर्गासाठी आजपासून परीक्षा आहेत. पुणे जिल्हा परिषदेतील विविध २१ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आतापर्यंत २१ पैकी १६ संवर्गाच्या नोकर भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली आहे. उर्वरित विविध पाच संवर्गातील भरतीसाठी येत्या १८ ते ३० जुलै २०२४ या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रे उमेदवारांना वितरित करण्यात आलेली आहेत. उमेदवारांनी परीक्षा देताना, या प्रवेशपत्रातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

Ajit Pawar: अजित पवारांची पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसोबत बैठक सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसोबत बैठक सुरू आहे. काल पिंपरी चिंचवडमधील काही नगरसेवकांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी तातडीने पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा उशिराने

मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा १० मिनिटं उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा २० मिनिटं उशिराने तर हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा १० मिनिटं उशिराने सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com