Marathi News Live Updates: रत्नागिरीत उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Maharashtra Political Breaking News 14th July 2024 : मुंबई पाऊस, लोकल ट्रेन अपडेट्स तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे वेगवान घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV
Published On

Ratnagiri Rain: रत्नागिरीत उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं उद्या जिल्हा प्रशासनानं केली सुट्टी जाहीर. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.

Bhima Shankar :   भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुफान गर्दी; ४ ते ६ किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा

मंचर भिमाशंकर मार्गावर ४ ते ६ किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्यात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला विकेंडमुळे भाविकांची गर्दी झालीय.

Old Mumbai-Pune Highway : खंडाळा बोरघाटात भर पावसात ट्रकने घेतला पेट

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भर पावसात खंडाळा बोरघाटात येथे एका वाहनाला आग लागली आहे. घटनास्थळी आयआरबी रेस्क्यू, खोपोली अपघातग्रस्तांची मदतीची टीम, आणि महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत.आगीवर नियंत्रण मिळवले आहे, मात्र आग कशाने लागलील हे समजू शकलं नाही.

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी व सहप्रभारी दोघेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहे. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसह जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Raigad Rain: कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे रुळावर माती आल्यानंतर वाहतूक बंद

विन्हेरे व दिवाणखवटी स्टेशन दरम्यान बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. ट्रॅक वरील माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी ५ ते ६ तास लागतील. दुरांतो एक्स्प्रेस माणगाव रेल्वे स्थानकात रखडली, प्रवाशांचे हाल होत आहेत.

Raigad Rain:  रायगडात धो-धो पाऊस; महाड शहरात शिरले गांधारी नदीचे पाणी

महाड शहरात शिरले गांधारी नदीचे पाणी

महाड शहरातील रायगड रस्त्यावर पुराचे पाणी

पाण्याची पातळी कमी असल्याने सुरु आहे वहानांची ये जा

NDRF च्या जवानांनी केली महाडमधील पूर परिस्थितीची पहाणी

शहरातील सखल भागात रहाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Amaravati Rain :  अमरावती शहरात मुसळधार पाऊस सुरू

मुसळधार पावसामुळे अमरावतीमधील अंबा नाल्याला पूर आलाय. १४ वर्षीय परवेज खान अफरोज खान असं पुरात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झाले आहे. नाल्यानजीक खेळायला गेलेला बालक अचानक नाल्यात पडला त्यानंतर तो वाहून गेला.

Mumbai Rain :  मुसळधार पाऊस; मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पाणीच पाणी

मुसळधार पाऊस झाल्याने  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पाणीच-पाणी झालंय. गुडघाभर पाण्यातून वाहने मार्गक्रमण करत आहेत. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुल परिसरात रस्त्यावर पाणी झालंय. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर येथे सखल भाग असल्याने पाणी साचले असून वाहनांना पुढं येताना खूप कसरत करावी लागते आहे.

Washim Rain: वाशिम जिल्ह्यात सकाळ पासून पावसाची संततधार .. पावसाने नदी नाल्यांना पूर

वाशिम जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, यात अडाण नदीला पूर आल्याने या नदी काठच्या एरंडा, बोराळा, किनखेडा येथील शेत जमीन पाण्याखाली आल्या आहेत, त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान होत शेत जमीन खरडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

CM Shinde : संत निळोबा यांच्या दिंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

पंढरपूर रोड वरील भोसे जवळ एकनाथ शिंदे यांची पायी वारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर जवळ पोहोचले आहेत.

मंत्री दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री पायी वारीत

Ratnagiri Rain :  रत्नागिरी जोरदार पाऊस; जगबुडी, नारंगीनदीने ओलांडली धोक्याची पातळी

मुसळधार पावसामुळे खेडमधील मच्छी मार्केट आणि बाजारपेठेतील सकल भागात पाणी

भरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत. तर पावसाच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर भातपीक पाण्याखाली गेले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Rain News:  रत्नागिरीत दमदार पाऊस; मुसळधार पावसामुळे शिवतर गावातील वाहून गेला रस्ता 

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सध्या दरड किंवा रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील शिवतर गावातील नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता एका ठिकाणी खचून पूर्ण वाहून गेला आहॆ. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. मुसळधार पावसामुळे सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी आशा घटना घडत आहे.

Nashik Accident : मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटत 5 वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटत धबधबा पाॅइंट जवळ 5 वाहनांचा चित्रित अपघात झाले असून अपघातातील जखमींना कसारा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वाहनांन मध्ये मारूती सियाझ ,ह्युंडाई,किया,मारूती बलेनो अस्या पाच वाहनांचा अपघात झाले आहे.

Agriculture News: लातूर जिल्हात 5 लाख 88 हजार हेक्टर वर सोयाबीनची लागवड

गत वर्षात लातूर जिल्ह्यात सोयाबीनला भाव कमीच राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र यंदा वेळेवर पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत 5 लाखात 88 हजार हेक्टरवर एकट्या सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी पावसाने उघड दिल्याने सोयाबीन उत्पादनात 60% टक्केपेक्षा अधिक घट झाली होती. त्यामुळे बाजारात भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यात होती. मात्र भाव मिळत नसतानाही यंदा सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे..

Pune News: भोर - मांढरदेवी मार्गावरील गोकवडी गावाच्या हद्दीतील रस्ता खचला

भोर मांढरदेवी मार्गावरील गोकवडी गावाच्या हद्दीत रस्ता खचलाय. संरक्षण कठड्यासह रस्त्याचा काही भाग खचला. रस्ता खचल्यानं रस्त्याच्या कामासाठी खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचे चाक त्यामध्ये रूतल्यानं डंपर अडकला आहे.

Sambhajinagar: आषाढी एकादशीनिमित्त 71 हजार लाडू पाठवणार, संभाजीनगरमधील महिलांचा उपक्रम 

छत्रपती संभाजीनगर शहरातील बालाजीनगर भागातील महिलांनी आणि विठ्ठलभक्तांनी तब्बल 71 हजार लाडू बनवन्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हे लाडू आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांना आणि वारकऱ्यांना मोफत वाटले जाणार आहे. मागील 18 वर्षांपासून अखंडपणे महिला हे लाडू बनवत असून दरवर्षी पंढरपूरला पाठवत असतात. यावेळी भक्तीगीत सादर करत आनंदाच्या वातावरणात महिला लाडू बनवले.

Ratnagiri News: रत्नागिरीत मुसळधार, दिवाणखवटी येथे नदीला पूर 

रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. खेडमधील दिवाणखवटी येथे नदीला पूर आला आहे. त्यामुळे गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेडमध्ये पावसाचा जोर कायम आहे. महसूल आणि पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

Pune News: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित

पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित झालं. आज दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु असणार आहे. नव्या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. सुसज्ज व्यवस्था आणि ६ बोर्डिंग गेट्स आणि एकाचवेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळत आहे.

 Ahmednagar News: निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भांडारदरा परिसरात पावसाचा जोर वाढला असून हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. याठिकाणी अनेक धबधबे प्रवाहित झाले असून हा परिसर पर्यटकांना खुणावतोय. शनिवार-रविवार विकेंड सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी भंडारदरा परिसरात मोठी गर्दी केली आहे. पावसाची संततधार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेत आहेत.

Pune News: पुणे पोलिसांची कारवाई! हातभट्टी बनवणारा कारखाना उध्वस्त 

पुणे पोलिसांकडून बनावट गावठी हातभट्टी बनवणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील फळीवस्ती येथील ओढ्यालगत सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलेय रामभोला मकाशी नानावत अस अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव

Mira Road News: मीरारोडमध्ये भलेमोठे झाड कोसळले 

मीरारोडच्या शांति पार्क सेक्टर १० मध्ये भलेमोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळले,सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी किवा वित्त हानी झाली आहे.दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मीरा भाईंदर शहराला चांगलेच झोडपूड काढले आहे.शहरातील अनेक ठिकाणी जूने व धोकादायक झाड काढणे गरजेचे आहे.मात्र पालिका प्रशासन सुस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

Raigad News: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रायगडमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात शिरले असून या भागात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी खालापुर परिसरात कोसळणाऱ्या पावसाचे आणि मुळशी परिसरातील पावसाच्या पाण्यामुळे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

Pune Crime: पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड

पुण्यात वाहनाच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. पुण्यातील पर्वती पोलीस स्थानकाच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञाताकडून जनता वसाहतीत वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.

Ashadhi Wari 2024: आषाढी वारी सोहळा: विठुरायाच्या पंढरीत ३ लाख भाविक दाखल

आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आज जवळपास तीन लाखाहून अधिक भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्शनाची दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत गेले आहे. दर्शन रांगेसाठी तयार केलेले दहा पत्राशेड भाविकांच्या गर्दीने हाउस फुल झाले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून पाणी चहा नाश्ता आधी सोय उपलब्ध करून दिली आहे.

Maharashtra Politics: विधानसभेची मोर्चेबांधणी! नंदुरबारमध्ये भाजपची  बैठक

येणाऱ्या विधानसभेसाठी भाजपच्या वतीने मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा भाजप जिंकणार असल्याचा निर्धार देखील यावेळी करण्यात आला असून लोकसभेच्या पराभवानंतर भाजप विधानसभेच्या तयारीला लागला असून भाजपच्या विद्यमान खासदार लोकसभेत पराभूत झाल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असून काँग्रेसची ताकद देखील वाढलेली आहे यातच भाजपने जिल्ह्यातील चारही विधानसभा जिंकण्याचा निर्धार केला आहे...

Aashadhi Wari 2024:  संत गजानन महाराज पालखीचे दामाजी नगरीमध्ये स्वागत

आषाढी वारीसाठी मजल दरमजल करत निघालेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आज मंगळवेढ्याच्या संत भूमीमध्ये दाखल झाला. यावेळी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी संत गजानन महाराज पालखीचे स्वागत केले. शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या संत गजानन महाराज पालखी सोहळा आता पंढरपूर समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Kolhapur News: विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला;  परिसरात मोठा तणाव

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा  चांगलाच पेटला आहे.  विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा व यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण करण्यात आली असून काही घरांवर दगडफेक करण्यात आली आहे.   हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.  विशाळगड परिसरात मोठा तणाव आहे. 

Mahad Rain News: महाडमध्ये जोरदार पाऊस; महाड विन्हेरे मार्गे खेड रस्ता बंद होण्याची भिती

महाडच्या विन्हेरे विभागात जोरदार पाऊस सुरु असून यामुळे तुळशी खिंड घाट रस्त्यात मातीचे आसरे रस्त्यावर येत आहेत. यामुळे संपूर्ण घाट रस्त्यावरून माती मिश्रीत लाल पाणी पहात असून वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तुळशी खिंड घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. महाड तुळशी खिंड मार्गे खेडकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशी वाहन चालकांनी काळजी घेण्याचे अवाहन या बातमी मार्फत केले जात आहे

Ratnagiri News:  मंडणगड तालुक्यात दरड कोसळली

रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तुळशी घाट आणि केळवत घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून तहसीललदार ,मंडळ अधिकारी, बांधकाम विभाग यांच्या उपस्थित ही दरड हटवण्यात आली.

Sindhudurg Amboli Waterfall: आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावर आज पर्यटकांची गर्दी झाली आहे. आंबोलीत पडणारा पाऊस, घाटातील धुके व उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मोठी दक्षता घेण्यात आली आहे. याठीकाणी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पर्यटकांना सकाळी ९ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धबधब्यावर जाता येणार आहे. प्रशासनाकडून आंबोलीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संध्याकाळी पाच नंतर धबधब्यावर प्रवेश उपलब्ध असणार नाही. यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासह अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.

Vishalgad Fort: विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमी आक्रमक

विशाल गडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनात नवी मुंबईतील शिवप्रेमी उपस्थित आहेत. नवी मुंबईतून स्वराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते विशाल गडाच्या पायथ्याशी दाखल झाले असून आज छत्रपती संभाजी राजे यांनी अतिक्रमण मुक्त विशाल गडाची हाक देत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Sunil Tatkare News: दादांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषदेत अभूतपूर्व यश मिळालं: सुनिल तटकरे

दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश आम्ही विधान परिषद मध्ये आम्ही मिळवलं हाच विश्वास आम्ही घेऊन पुढे विधानसभेला जात आहोत. महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र लवकरच ठरेल. महायुती मधील घटक पक्षांचा सन्मान करत जागा वाटप होईल. लोकसभेला जेव्हा राहिल्या त्या यावेळेस राहणार नाही. मराठा आरक्षण संदर्भात सरकार गांभीर्याने घेतलं आहे. सर्व पक्षांना सोबत घेऊन निर्णय घेतला आहे पुढे देखील संवाद होईल, असे सुनिल तटकरे म्हणाले.

Mumbai News: बेडरुमच्या छताचे प्लास्टर कोसळले; पती- पत्नी जखमी

दिवा येथील पूर्वेकडील नवीन प्लाझा या इमारतीमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींवर बेडरूमच्या छताचे प्लास्टर पडून पती आणि पत्नी जखमी झाले आहेत. त्यांची नाव अंकित सिंग आणि सोनम सिंग असे नाव आहे. त्या दोघांचे डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांचा वर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरची घटना पहाटे घडली आहे.

Chandra Babu Naidu Meet CM Eknath Shinde: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू CM शिंदेंच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू वर्षा बंगल्यावर आले आहेत. दोन्ही मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.

Bhandup News: भांडुपमध्ये घराचा भाग कोसळला; फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल

भांडुप फरीद नगरमध्ये घराचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच फायर ब्रिगेड पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहे. यामध्ये कुठलाही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

Pandharpur News: दुर्दैवी! ट्रॅव्हल्सच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू 

टेंभुर्णी रस्त्यावर ट्रॅव्हल वाहनाने दिलेल्या धडकेत पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. करकंबजवळ आज सकाळी ही घटना घडली. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पायी पोलीस आणि आरटी कडून वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे.

Pooja Khedkar News : मोठी बातमी! IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी पोलीस धडकले

IAS पूजा खेडकर यांच्या बाणेर रोडवरील घरी पोलीस दाखल

घराची पाहणी करून पोलीस निघून गेले

नेमके पोलिस का आले होते याची माहिती मिळू शकली नाही

ऑडी कार वाहतुक विभागाच्या ताब्यात आली आहे

त्यामुळे आता पोलीस अजून काय कारवाई करतात हे पहावं लागणार आहे

Nagpur News : ब्युटी सलूनमध्ये देह व्यापार करणाऱ्या दोन महिलांना अटक

नागपूरच्या धरमपेठ येथील वेस्टहायकोर्ट मार्गावरील आनंद भंडार बिल्डिंगमधील नेचर ब्युटी सलूनमध्ये देह व्यापार सुरू होता. मसाजच्या नावावर पीडित युवतींना अधीक पैसे कमविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतल्या जात होता.

यासंदर्भातील माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामजिक सुरक्षा पथकाने सलूनवर छापेमारी केली. यावेळी दोन आरोपी महिलांना अटक करून तीन पिडीत युवतीची सुटका करण्यात आली. सोफिया शेख आणि आकांशा मेश्राम, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेची नावे आहेत.

Mumbai Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक नवव्या दिवशीही मंदावली

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यात महामार्गावर पडलेले खड्डे, बंद पडलेले ब्रिज चे काम व रात्री पासून पडणार मुसळधार पाऊस यामुळे आज 9 व्या दिवशी ही सकाळ पासून नाशिक हून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडी चार सामना करावा लागत आहे. रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडी ची सुटका कशी होईल या करिता प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला

कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट.

मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला.

पंचगंगा नदीची पाणी पातळी 18 फूट एक इंचावर.

तब्बल 14 बंधारे पाण्याखाली गेले.

पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू.

Pune Rain News : पुण्यात पावसाचा जोर वाढणार, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

पुण्यात पावसाचा जोर वाढणार

घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मॉन्सून सक्रिय झाल्याने पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती

रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

संततधारपणे पडणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना मॉन्सूनच्या सरींची अनुभूती

Ratnagiri News : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकिय रेस्टहाऊस तसेच समर्थ अपार्मेट याठिकाणी पुन्हा पुराचे पाणी घुसल्याने वाहन चालकाची कसरत करावी लागत आहे. रस्ता जलमय झाल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे.

जिल्ह्यात कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे तर काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Raigad News : रायगडमधून वाहणाऱ्या तीन नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

० उत्तर रायगडमध्ये पावसाचा जोर कायम

० जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची बरसात सुरू

० खालापुरातील सावरोली येथील नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले

० रायगडमधून वाहणाऱ्या तीन नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

० अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

० नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Palgahar News : पालघरमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

शनिवारी दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज ऊसंती घेतल्याने पालघरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे . मात्र अस असल तरी पालघर जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट असल्याने आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे .

पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील भात शेतीतील रोपणीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येतोय . तर काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्याना पूर आला असून धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली पाहायला मिळते.

Mumbai Rain News Updates : मुंबईसह कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबईतही आजही मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगराला आज पावसाचा येलो अलर्ट जोरी करण्यात आला आहे. कोकणातही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता, आॅरेंज अलर्ट जारी. ठाण्यात आज आॅरेंज अलर्ट, काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज, मागील २४ तासात ठाणे शहरात १२० मिमीहून अधिक पावसाची शक्यता पालघरमध्ये आज यलो अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com